Homeकल्चर +‘लोकशाही’चे शीर्षक पोस्टर...

‘लोकशाही’चे शीर्षक पोस्टर लाँच!

शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्त्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही’. याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण करणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच सर्व सोशल मीडियावर प्रदर्शित होऊन महाराष्ट्रभर अत्यंत वेगाने पसरत आहे.

सुशीलकुमार अग्रवाल निर्मित आणि संजय अमर दिग्दर्शित ‘लोकशाही’ चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटाच्या दृकश्राव्य शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. पोस्टरमध्ये उंच इमारती आणि त्यांना लागूनच असणारी झोपडपट्टी दिसत आहे. पांढरपेशी भांडवलदारांनी तयार केलेलं स्वत:चं अलिशान शिखर आणि भांडवलदारांच्या भागीदारीत तेवढ्याच हिश्श्याचे पात्र असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या वंचित लोकांचे कदाचित ते प्रतीक असल्याचे दिसत आहे. तसेच लालभडक धुकट वातावरण आणि चित्रपटाचे नाव, एकूणच चित्रपट राजकारणाशी संबंधित संघर्षाला चिन्हांकित करत असल्याचे दिसत आहे.

पोस्टरमध्ये एकामागोमाग येणारे शीर्षकाचे शब्द आणि शब्दांना साथ देत गूढ आणि उस्फूर्त करणारं पार्श्वसंगीत चित्रपटाबद्दल कमालीचं आकर्षण निर्माण करत आहे. पोस्टरमध्ये अद्याप कलाकारांची नावे घोषित केलेली नसून प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून कलाकारांबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना उत्तेजित करत आहे. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या ‘लोकशाही’ चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांचा हा विलक्षण प्रतिसाद पाहून आम्हालाही चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूपच उत्सुकता लागली आहे. लवकरच चित्रपटाचा पूर्ण पोस्टर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचणार आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

‘लोकशाही’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर पाहण्यासाठी

FACEBOOK: https://www.facebook.com/share/v/93XPdqAZRNhuJurG/?mibextid=QwDbR1

INSTAGRAMhttps://www.instagram.com/reel/C14F1-VJMR8/?igsh=MTNiemlvM3g4b2ZmbA==

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content