Homeकल्चर +९२ वर्षीय वसंत...

९२ वर्षीय वसंत म्हात्रेही सहभागी झाले यंदाच्या पार्ले महोत्सवात!

मुंबईत गेल्या आठवडाभरापासून ३२ विविध स्पर्धांमधून रंगत आणत गेलेल्या २३व्या पार्ले महोत्सवाची यशस्वी सांगता जल्लोष आणि चैतन्यमय वातावरणात झाली. यंदाच्या या महोत्सवात ३९२ प्रथम पारितोषिकांसह २५ हजार एकूण बक्षिसांचे वाटप करण्यात आले तर यंदाच्या ३० हजार स्पर्धकांसह ८०० कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग मिळाला. ६ महिन्याच्या बाळाचा सदृढ बालक स्पर्धेत तर ९२ वर्षीय वसंत म्हात्रे यांचा हस्ताक्षर स्पर्धेतील सहभाग हे या महोत्सवाचे वेगळेपण ठरले.

 या महोत्सवाच्या यशस्वी होण्यामागचे श्रेय मुख्य आयोजक आमदार पराग अळवणी यांनी कार्यकर्त्यांना दिले असून दरवर्षी हा महोत्सव वाढत जातो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांवरील जबाबदारी देखील वाढत जाते, पण ती चोखपणे पेलण्याचे काम सर्वजण करत असतात, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.

महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला भेटी दिल्या. मिलिंद शिंदे, श्रीकृष्ण आंबेकर, विनीत गोरे, विलास करमळकर, एन. सुरेशन, प्रवीर कपूर, राजेश मेहता, माजी नगरसेविका ज्योती अळवणी आणि सुनिता मेहता, माजी नगरसेवक अनिष मकवानी अणि अभिजीत सामंत आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली विलेपार्ले परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विविध स्पर्धांमधून स्पर्धकांनी उत्सफूर्त सहभाग देत सांस्कृतिक, क्रीडा विभागात आपले कला-कौशल्य सादर केले. त्यामुळे संपूर्ण विलेपार्ले महोत्सवमय झाले होते. अंतिम सामन्यांच्या विजेत्यांना समारोपाच्या वेळी पारितोषिके देण्यात आली. त्यावेळी उपस्थितांच्या जल्लोषमय वातावरणाने आणि खिलाडूवृत्तीने कार्यक्रमात एकच रंगत आणली. पार्ले महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून खरा एकता, चैतन्य आणि खिलाडूवृत्तीचा उत्सव आहे, अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी दाखवून दिल्या.

होम मिनिस्टर ठरल्या सुनिता गुंडे

पार्ले महोत्सवातील होम मिनिस्टर होण्याचा पहिला मान सुनिता गुंडे तर दुसरा मान राजश्री मांडवकर यांना मिळाला. त्यांना मानाची पैठणी देण्यात आली. उत्तम पेहरावाबद्दल रेखा विश्वकर्मा, सुरेखा डिंगणकर, पूनम सिंग, प्रिया सावंत यांना पारितोषिके मिळाली. त्याचबरोबर पहिल्या गटात स्वरा कदम, मेघना गावंडे, अक्षता धनावडे तर दुसऱ्या गटात श्रृतिका नारकर, प्राची शेंड्ये, वैशाली सुतार यांना पहिली तीन पारितोषिक देण्यात आली.

वरिष्ठ नागरिकांचाही उत्साहपूर्ण सहभाग

वरिष्ठ नागरिकांसाठी विविध गटांमध्ये आयोजित कऱण्यात आलेल्या स्पर्धेत सारंग सबनीस, अपर्णा कुलकर्णी, मंजुळा ठक्कर, सुनिता जाधव, विलासिनी चित्रे यांनी बाजी मारली. त्याच्या खालोखाल प्रिया परुळेकर, प्रमोद शेंडे, शुभदा नार्वेकर, तारमती हडशी, कुसुम भरणकर यांनीही क्रमांक पटकावला. वरिष्ठ नागरिकांच्या स्पर्धेचे विशेष म्हणजे ९२ वर्षीय वसंत म्हात्रे यांनी हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले.

अटीतटीची शरीरसौष्ठव स्पर्धा

शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेते आणि उपविजेते गटनिहाय – ५५ किलो – अक्षय गव्हाणे, ओमकार आंग्रे, ६० किलो – गणेश पाटील, सचिन बोईनवाड, ६५ किलो – सैमी खान, अनिल जयस्वाल, ७० किलो – उमेश गुप्ता, नदीम अन्सारी, ७५ किलो – सुरत निर्मल, विशाल धावडे, ८० किलो – अमित साटम, अक्षय खोत, ८० किलोवरील – हरमित सिंग, अभिषेक लोंढे.

मेहंदीची कलात्मकता

मेहंदी स्पर्धेतील विजेते क्रमनिहाय – शालेय गट – अप्सरा अन्सारी, ऱफिया अन्सारी, हिना खातून, ध्रुवी, झीनत शेख, ज्योती यादव, अल्सिफा अन्सारी, भारतीय गट – अफरीन अन्सारी, सुप्रिया कारणे, अनिषा सोखिया, जस्मिन बुच, कशिश गलैया, नियाद तांडेल, अरेबिक गट – दिप्ती धुल, सोनाली मोरे, प्राजक्ता बेटकर, शबीना गलब, खुशी पासी, सुवर्णा कवठेकर.

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content