Homeकल्चर +मुंबई-२ केंद्रातून चांदतारा...

मुंबई-२ केंद्रातून चांदतारा सर्वप्रथम!

६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई-२ केंद्रातून विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘चांदतारा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच पोलीस कल्याण केंद्र, मुंबई या संस्थेच्या ‘एकेक पान गळावया’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी काल केली. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या ‘घायाळ’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

मुंबई-२ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक- सुनिल कदम (एकेक पान गळावया), द्वितीय पारितोषिक- रमाकांत जाधव (चांदतारा)

प्रकाशयोजनाः प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (चांदतारा), द्वितीय पारितोषिक विनोद राठोड (आर्यम)

नेपथ्य: प्रथम पारितोषिक प्रदिप पाटील (चांदतारा), द्वितीय पारितोषिक कविता विभावरी (घायाळ)

रंगभूषाः प्रथम पारितोषिक उल्लेश खंदारे (घायाळ), द्वितीय पारितोषिक वैभव सावंत (चांदतारा)

उत्कृष्ट अभिनयः रौप्यपदक सुशिल इनामदार (एकेक पान गळावया) आणि वैदेही मुळे (घायाळ)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रेः डॉ. सोनल शिंदे (दिवान-ए-मख्फी), सृष्टी शेलार (अंगणातली रांगोळी), समृध्दी खडके (मन मनास उमगत नाही), तनिषा वर्दे (चल थोडं अॅडजस्ट करु), अदिती खानविलकर (आर्यम), भावेश टिटवळकर (चल थोडं अॅडजस्ट करु), सुशिल घाडगे (द आऊटबर्स्ट), सायली साळवी (द रेन इन द डार्क), रोहीत खरवडे (द आऊटबर्स्ट), रविंद्र गिरकर (देव चोरला माझा), सोमनाथ शिंदे (दिवान-ए-मख्फी).

दि. २१ नोव्हेंबर २०२३ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वसंत सामदेकर, ईश्वर जगताप आणि प्राची गडकरी यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Continue reading

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून...

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...
Skip to content