Homeकल्चर +पार्ले महोत्सवात ६...

पार्ले महोत्सवात ६ महिन्यांच्या बालकांनीही मारली बाजी

वर्षभर पार्ले महोत्सवातील स्पर्धांची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धकांनी यंदा एकच रंगत आणली असून प्रत्येकजण आपले कसब पणाला लावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या महोत्सवात वेगवेगळ्या ३२ स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात सदृढ बालक स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांचाही सहभाग आहे, हे विशेष. यातील सदृढ बालक स्पर्धेत सहा महिन्यांच्या सात्विक खातू, यशस्विनी सोनार, अरझान खान या बालकांनी बाजी मारली.

पार्ले

६ ते  १२ महिन्यांच्या वयोगटात निशिता सिद्पुरा, प्रियांश राड्ये, प्रणशी श्रीकार यांनी पहिल्या तिघांमध्ये तर तनीश व्होरा, विरा पाटेरे, आयर्व यादव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. १ ते २ वर्षे वयोगटात क्रिशिव नाईक, श्रेयाशी कदम, मान व्होरा यांना पहिली तीन तर युविका पटेल, युवान पटेल, शिवम गौरव, आनार्य परमार, युवान चंदालिया, अथेना कांत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

पार्ले

वामन मंगेश दुभाषी मैदान, साठ्ये महाविद्यालय, पार्ले टिळक विद्यालय, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, उत्कर्ष मंडळ सभागृह, सहार गाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा सुरु आहेत. सदृढ बालक, कबड्डी, मल्लखांब, बुद्धीबळ, पिकल बॉल, फुटबॉल, सायकलिंग, व्हॉली बॉल, बॉक्स क्रिकेट, शरीरसौष्ठव, कॅरम, गायन, चित्रकला, हस्ताक्षर लेखन, मेहंदी, रांगोळी, आदी स्पर्धा गेल्या दोन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आल्या.

विविध गटांमधील स्पर्धांची प्राथमिक फेरी झाली असून आता येत्या दोन दिवसांत त्यांच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांची लढत होईल. सध्या तरी या फेऱ्यांसाठी खेळांडूंमध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे. स्पर्धांमधील उत्साह हा अत्यंत भारावणारा आहे तसेच या स्पर्धांमधील खेळाडू अथवा स्पर्धक हे नक्कीच भविष्यात आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा लौकिक वाढवतील, असा विश्वास महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार पराग अळवणी यांनी व्यक्त केला.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content