Homeचिट चॅटविजय शास्त्री यांचे...

विजय शास्त्री यांचे गोव्यात निधन

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय काशिनाथ शास्त्री (८२) यांचे गोवा येथे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

विजय शास्त्री यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिनू रणदिवे व अशोक पडबिद्री यांच्यासमवेत कार्य केले होते. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र छपाई करून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले. मुंबईच्या नागरी सुविधांसाठीही त्यांनी काम केले.

शिवसेनेचे माजी महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्यासमवेत मुंबईत दादर व चेंबूर येथे सामाजिक कार्य त्यांनी केले. चेंबूर लायन्स क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यासोबतही युवा वर्गासाठी त्यांनी भरीव कार्य केले. माजी शिक्षणमंत्री सुधीर जोशी यांच्यासमवेत १२ वर्षे सीकेपी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी उत्तमरीत्या जबाबदारी सांभाळली. कोविडच्या काळात रूग्णसेवेला वाहून घेणाऱ्या डॉ. स्नेहा पुरंदरे त्यांच्या कन्या होत. ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे, शास्त्री यांचे जावई आहेत.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content