Homeकल्चर +भरारी प्रकाशनच्या चार...

भरारी प्रकाशनच्या चार पुस्तकांचे प्रकाशन!

कोकण मराठी साहित्य परिषदेचे १७वे साहित्य संमेलन नुकतेच मॉरिशस येथे झाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मॉरिशस येथील सभागृहांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये मुंबई येथील भरारी प्रकाशनच्या चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यात लता गुठे लिखित ‘भाव-विभोर’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन झाले.

भरारी

हे लता गुठे यांचे 21वे पुस्तक असून भरारी प्रकाशनचे 250वे पुस्तक मॉरिशसच्या व्यासपीठावर प्रकाशित झाले हा भरारी प्रकाशनसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. यासह उषा परब यांच्या ‘स्वरसम्राज्ञी’ (एकांकिका), प्रशांत राऊत’ लिखित मिस कॉल’ (कथासंग्रह) व ‘बोली-अबोली’ (काव्यसंग्रह) अशा पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी संमेलन अध्यक्ष विजय कुवळेकर, कोमसापचे अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ मॉरिशस मराठी स्पीकिंग फेडरेशनचे अध्यक्ष नितीन बापू आणि मॉरिशस येथील खासदार असलेस किट्टू उपस्थित होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content