Homeएनसर्कलपंतप्रधान मोदींनी साधला...

पंतप्रधान मोदींनी साधला ‘विकसित भारता’च्या लाभार्थी प्रियंका देवींशी संवाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. सध्या देशभरात, केंद्र सरकारच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योग्य वेळेत त्यांची संपूर्ण अंमलबजवणी सुनिश्चित करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा राबवली जात आहे.

बिहारमध्ये दरभंगा येथील गृहिणी आणि विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थी प्रियंका देवी यांनी पंतप्रधानांना सांगितले की, त्यांचे पती मुंबईत रोजंदारीवर काम करणारे श्रमिक आहेत आणि त्यांना ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजनेचा लाभ मिळतो आहे. तसेच पीएम जी के ए वाय आणि जन धन योजना अशा योजनांचाही लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: कोविडच्या काळात किंवा इतर संकट काळात आर्थिक चणचण असताना या योजनांमुळे मोठी मदत झाली असे त्यांनी सांगितले.

मोदी की गारंटी या वाहनाबद्दल लोकांमधे अत्यंत उत्साह आहे, असे त्यांनी सांगितले. मिथिला भागात पारंपरिक पद्धतीने या वाहनाचे स्वागत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या योजनांमुळे त्यांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेता येते आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी प्रियंका यांना त्यांच्या गावात सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले आणि ‘मोदी की गारंटी’ वाहन देशातील प्रत्येक गावात पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. ‘मोदी की गारंटी’ वाहनाच्या माध्यमातून, सरकार स्वत: पोहोचू न शकलेल्या लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे सांगत, महिलांच्या मनात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने फुटीरतावादी राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला. महिलांना अखंड पाठिंबा देण्याची ग्वाही देतानाच, आमच्यासाठी महिला ही एकच जात आहे, त्यात कोणतीही विभागणी नाही, भेदभाव नाही. ही जात इतकी मोठी आहे की त्या एकत्र कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content