Homeकल्चर +शरद, स्नेहा, मिलिंद...

शरद, स्नेहा, मिलिंद व रश्मी झाले ‘सिंगिंग स्टार’!

‘गामा फाऊंडेशन’आयोजित “सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१” या हिंदी गीतांच्या ‘कराओके गायन स्पर्धेची अंतिम फेरी फेसबूकच्या माध्यमातून नुकतीच संपन्न झाली. विजेत्यांमध्ये १८ ते ४५ पुरुष आणि महिला गटातील अनुक्रमे शरद जगताप आणि स्नेहा कांबळे, दुसऱ्या ४६ ते ८० या पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे मिलिंद कुलकर्णी आणि रश्मी लुकतुके त्याचबरोबर एक उत्तेजनार्थ गटातील स्मिता चंदावरकर यांची निवड करण्यात आली.

हौशी स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम विशेष रंगला होता. जगभरातील संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आस्वाद घेतला. गेल्या दोन वर्षांत कोरोनाने घातलेले थैमान आणि त्याला धीराने सामोरी जाणारी जनता. तसेच कोरोनाला हरवून लावण्यासाठी अहोरात्र लढणारे आपले कोरोना योध्ये. या महामारीसोबत लढणाऱ्या कोरोना योध्यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली होती.

सध्याच्या कठीण काळात आपल्यातील अनेक गुणी हौशी कलावंतांच्या गायन छंदाला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे हाही प्रमुख हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे होता. स्री आणि पुरुष वय वर्षं १८ ते ४५ आणि ४६ ते ८० असे दोन गट करण्यात आले होते. तसेच स्पर्धकांकडून विनामूल्य प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. ८ मे रोजी ही स्पर्धा जाहीर केल्यावर २२ मेपर्यंत जवळजवळ २५०च्या वर प्रवेशिका आल्या. त्यातील १२ स्पर्धक ‘गामा फाऊंडेशन’कडून शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.

दोन तास सुरू असलेल्या कार्यक्रमात स्पर्धकांचा उत्साह खूपच चांगला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस न्यूज अँकर अश्विन बापट यांनी स्पर्धेचे नियम स्पर्धकांना अधोरेखित करून दिले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे परीक्षक आणि ख्यातनाम संगीत संयोजक प्रशांत लळित आणि ख्यातनाम गायिका विद्या करलगीकर यांची ओळख केल्यावर स्री स्पर्धकांपासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

परीक्षकांनी सुचवलेल्या गाण्यावर स्पर्धकांनी गाणे गाण्यास सुरुवात केली. हळूहळू गाण्याची स्पर्धेतील चुरस खूपच वाढत गेली. स्पर्धा फेसबुकवर लाईव्ह असल्यामुळे ती प्रत्यक्ष पाहणाऱ्या रसिकांचा व्हिडीओवर कॉमेंट्सचा वर्षाव होत होता.

फ्रंटलाईन कोरोना योद्धा असलेले डॉ. राहुल जोशी कार्यक्रमाच्या मध्यान्यात सहभागी झाले. डॉक्टरांनी त्यांच्या कोरोना कार्यकाळातील काही गोष्टींचा अनुभव कथन केला. त्यांनी ‘संत कबीरा’चा दोहा गाऊन गाण्यातून आपण आपलं काम करत राहावं असा संदेश दिला. ह्या स्पर्धेच्या परीक्षक विद्या करलगीकर यांनी परीक्षणासोबतच स्पर्धकांना बहुमूल्य मार्गदर्शनही केले. विशेष अतिथी प्रमोद कुलकर्णी यांनीही स्पर्धकांच्या गायनकौशल्याचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली. पुरुष आणि महिलांमध्ये २ गटात एकूण ४ बक्षिसे देण्यात आली. प्रत्येकी १०००/- आणि विद्या करलगीकर यांच्या आग्रहात्सव एक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणजेच एक हजार रुपयाचा चेक कार्यक्रमाचे विशेष पाहुणे ‘कुलकर्णी ऑप्टीशन्स’चे प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला. विजेत्यांना बक्षिसरुपी धनादेश व प्रमाणपत्र त्यांच्या निवासी पत्त्यावर पाठविण्यात आले आहेत.


Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content