Homeन्यूज अँड व्ह्यूजसिलक्यारा बचाव कार्याबाबतच्या...

सिलक्यारा बचाव कार्याबाबतच्या खळबळजनक वृतांकनावर बंदी!

उत्तराखंडात सिलक्यारा येथे सध्या सुरू असलेल्या बचाव कार्याबाबत खळबळजनक वृत्तांकन करण्यापासून दूरचित्रवाणी वाहिन्यांना परावृत्त करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल एक सूचना जारी केली आहे.

या सूचनेनुसार, वाहिन्यांनी बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणच्या बोगद्याच्या आजूबाजूची परिस्थिती दर्शवणाऱ्या कोणत्याही थेट पोस्ट्स अथवा व्हिडिओ प्रसारित करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणी अथवा लगतच्या परिसरात कॅमेरामन, पत्रकार किंवा त्यांची साधने यांच्या उपस्थितीमुळे विविध संस्थांतर्फे माणसांचे जीव वाचवण्यासाठी तेथे सुरु असलेल्या कामात अडथळा निर्माण होणार नाही अथवा हे कार्य करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची सुनिश्चिती करून घेण्याच्यादेखील सूचना केंद्रीय मंत्रालयाने दिल्या आहेत.

बोगद्याचे बांधकाम पूर्ण झालेल्या 2 किलोमीटरच्या भागात अडकलेल्या कामगारांशी सरकार सातत्याने संपर्क करत असून त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेथे अडकलेल्या 41 कामगारांची सुरक्षितपणे सुटका करण्यासाठी विविध सरकारी संस्था अथक प्रयत्न करत आहेत. बोगद्याच्या ठिकाणी सुरु असलेले बचावकार्य अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असून त्यामध्ये अनेक जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी तेथे सुरु असलेल्या कामाचे व्हिडीओ आणि संबंधित छायाचित्रे प्रसारित करण्यामुळे विशेषतः बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणाच्या जवळ कॅमेरे तसेच इतर साधने बसवल्यामुळे सध्या तेथे सुरु असलेल्या बचावकार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

या दुर्घटनेचे वृत्तांकन करताना विशेषतः ठळक बातम्या, व्हिडीओ आणि तेथील परिस्थिती दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करताना दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सतर्क राहावे तसेच संवेदनशीलता बाळगावी अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. तसेच या बचाव कार्याचे संवेदनशील स्वरूप, तेथे अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांची मनस्थिती तसेच एकंदर, सर्वसामान्य प्रेक्षकांची परिस्थिती यासंदर्भात योग्य ती काळजी घेऊन वृत्तांकन करावे असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वाहिन्यांना दिला आहे.

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content