Sunday, September 8, 2024
Homeकल्चर +'कॅचिंग डस्ट’ या...

‘कॅचिंग डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटाने 54व्या इफ्फीचा प्रारंभ!

चित्रपटांमध्ये सीमा ओलांडण्याची, सामूहिक मानवी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि मानवी भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे एकमेकांशी जोडण्याची विलक्षण शक्ती असते, ही एक व्यापकपणे स्वीकारलेले प्रतिमान आहे. गोवा येथे आयोजित 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) “कॅचिंग डस्ट” या चित्रपटाने प्रारंभ झाला, या चित्रपटाने हीच भावना कायम ठेवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चित्रपटाच्या आकर्षक कथानकाने अनोख्या दृश्य कलात्मकतेसह, चित्रपटाचा एक विलक्षण प्रवास दाखवला.

या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी खचाखच भरलेल्या सिनेमागृहात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री, डॉ एल मुरुगन यांनी चित्रपटातील कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचा सत्कार केला.

स्टुअर्ट गॅट दिग्दर्शित, या चित्रपटात एरिन मोरियार्टी, जय कोर्टनी, दिना शिहाबी, रायन कॉर, जोसे अल्टिट, गॅरी फॅनिन आणि ओल्वेन फ्युरे या कलाकारांचा समावेश आहे. मिश्र आशियाई संस्कृतीचा वारसा लाभलेले दिग्दर्शक स्टुअर्ट गॅट हे  पुरस्कार-विजेते ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक आहेत. ज्यांच्या चित्रपटाचे कथानक बर्‍याचदा सामाजिक विषयांवर प्रभाव टाकणारे असते.

चित्रपटाचे कथानक: 96 मिनिटांचा हा चित्रपट टेक्सासच्या बिग बेंडच्या दुर्गम वाळवंटातील नाट्य आहे. यात एकाकी आणि दबून जगणारी जीना आणि तिचा गुन्हेगार नवरा क्लॉइड काहीसे अनिच्छेने एकमेकांसोबत या वाळवंटात राहात असतात. पतीच्या वर्तनामुळे वैतागलेली जीना निघून जाण्याचा निर्णय घेते, तेव्हा अचानक न्यूयॉर्कमधून एक दाम्पत्य तेथे येते. या दांपत्याच्या तिथल्या उपस्थितीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांना तिथे राहू देण्यासाठी क्लॉइडला पटवून देते. ज्याचे सर्वांसाठी धोकादायक परिणाम होतील असा हा निर्णय असतो. स्पष्ट निराशा आणि हताश मानसिकतेचा सामना करताना निराशेच्या पलीकडील समाधान शोधण्याच्या खोलवरच्या पातळीवर हा चित्रपट प्रेक्षकांना मोहित करतो.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content