Homeएनसर्कलआज भारत-अमेरिका यांच्यात...

आज भारत-अमेरिका यांच्यात मंत्रीस्तरीय द्विपक्षीय चर्चा!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय चर्चेचे सह-अध्यक्षपद भूषवण्यासाठी आणि  द्विपक्षीय बैठकीसाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन कालपासून भारत दौऱ्यावर आहेत. ऑस्टिन यांचे 09 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर, पालम तांत्रिक परिसरात तिन्ही सेना दलाकडून मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आज भारत-अमेरिका यांच्यात मंत्रीस्तरीय द्विपक्षीय चर्चा होत आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन 10 नोव्हेंबर रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासह मंत्रिस्तरीय 2+2 चर्चेचे सह-अध्यक्ष भूषवतील. त्यानंतर ऑस्टिन आणि भारताचे संरक्षण मंत्री यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल. 2+2 चर्चा आणि द्विपक्षीय बैठकीदरम्यान अनेक धोरणात्मक, संरक्षण आणि तंत्रज्ञान मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी ऑस्टिन यांनी जून 2023 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content