Sunday, December 22, 2024
Homeमुंबई स्पेशलअंधेरी-गोरेगाव भागात मंगळवारी...

अंधेरी-गोरेगाव भागात मंगळवारी पाणी नाही!

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागामध्ये ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट)चे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईतल्या के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे.

के पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गावरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटीजवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी (वर्सोवा आऊटलेट) जोडण्याचे काम, वेरावली जलाशय १ व २चे संरचना काम हाती घेण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुमारे १५ तास के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील खालील परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर

१) के पूर्व विभाग- त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व), सारीपुत नगर, दुर्गा नगर, जोगेश्वरी (पूर्व), दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदीर (जे.व्ही.एल.आर.) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, मेघवाडी, पंप हाउस, विजय राऊत रस्ता, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, सर्वोदय नगर, कोकण नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान मार्ग, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्ले पूर्व, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, भगत सिंग व चरत सिंग वसाहत, अंधेरी पूर्व, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग रस्ता, निकोलसवाडी परिसर. 

२) के पश्चिम विभाग- जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस.व्ही. मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व), यादव नगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली हिल.  

३) पी दक्षिण-  राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा).

पाणीपुरवठा वेळेत बदल

के पश्चिम विभागाच्या एस व्ही मार्ग, व्ही. पी मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात सध्या दररोज पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात दिनांक १ नोव्हेंबर २०२३पासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content