Homeकल्चर +दादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा शनिवारी युवा महोत्सव

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दिवंगत मधुकर, मनमोहन आठल्ये आणि एस. एम. गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा महोत्सव’ आयोजित केला आहे. यात प्राजक्ता काकतकर आणि शिवानी मिरजकर यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात सादर करण्यात येणार आहे.

प्राजक्ता काकतकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रतिमा टिळक यांच्या शिष्या आहेत. त्यांनी संगीत या विषयात एम. ए. केले असून संगीत विशारद ही पदवीही प्राप्त केली आहे. काही संगीत संमेलनांमध्ये कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांना तबल्याची साथ प्रसाद काकतकर आणि संवादिनीची साथ अभिजीत काकतकर करतील.

शिवानी मिरजकर या पं. चंद्रशेखर पुराणिकमठ (ग्वाल्हेर / किराणा घराणे), पं. कैवल्यकुमार गुरव (किराणा घराणे) आणि पद्मश्री पं. उल्हास कशाळकर (ग्वाल्हेर / जयपूर / आग्रा घराणे) यांच्या शिष्या आहेत. त्यांनी संगीत विषयात बी.ए., एम.ए. या पदव्या प्राप्त केल्या असून सध्या म्युझिकॉलॉजीमध्ये पीएच.डी. करीत आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून देशभरात विविध प्रतिष्ठित मैफलींमध्ये त्यांचे गायन झाले आहे. त्यांना तबल्याची साथ विनय मुंढे आणि संवादिनीची साथ अभिनय रवंदे करणार आहेत. अधिकाधिक रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. 

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content