Homeएनसर्कलIAADBच्या कार्यक्रमासाठी कर्टन...

IAADBच्या कार्यक्रमासाठी कर्टन रेझर आणि लोगो लॉन्च!

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे काल संध्याकाळी इंडिया आर्ट आर्किटेक्चर डिझाईन बिएनाले-2023 (IAADB ‘23) या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘कर्टन रेझर’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या कार्यक्रमाच्या लोगोचेही उद्घाटन करण्यात आले.

यावेळी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि वायव्य प्रदेशातील राज्यांच्या विकास विभागाचे मंत्री जी. किशन रेड्डी यांनी घोषणा केली की, सांस्कृतिक मंत्रालय इंडिया आर्ट आर्किटेक्चर डिझाइन बिएनाले या कार्यक्रमाचा प्रारंभ डिसेंबर 2023 मध्ये करणार असून या कार्यक्रमांतर्गत दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. त्यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या.

परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी कार्यक्रमात बीजभाषण केले. इंडिया आर्ट आर्किटेक्चर डिझाइन बिएनाले कार्यक्रम भारताच्या उत्सव संस्कृतीमध्ये दीपस्तंभ म्हणून काम करेल ज्याच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताच्या अलौकिक अशा वास्तुशिल्प आणि कलेचे प्रदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय समकक्षांच्या भव्यतेला प्रतिबिंबित करणारा ठरणार असून यामुळे केवळ प्रेरणाच नव्हे तर मोठा बदल देखील अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे भारतातील तळागाळातील कारागीर आणि समकालीन डिझायनर यांना सहभागी करून त्यांच्यात परस्पर संवाद, नावीन्य आणि सहयोगाची सुरुवात होईल, ज्यामुळे सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

या कार्यक्रमात डिप्लोमॅट्स, कलाकार, वास्तुविशारद, डिझायनर, क्युरेटर, सरकारी अधिकारी, गॅलरिस्ट आणि संग्रहालय कामकाजाशी संबंधित व्यावसायिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. यावेळी ‘कॅपिटल थ्री’ या जॅझ संगीत कलाकारांनी आपल्या मनमोहक संगीताने या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Continue reading

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...

‘कोटक सिक्युरिटीज’ने सुचविले काही धमाकेदार दिवाळी शेअर्स!

"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक या ब्रोकरेज हाऊसने शॉर्टलिस्ट केले आहेत. अदानी पोर्ट्स-सध्याची किंमत (CMP): ₹ 1,419पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट: ₹ 1,900गुंतवणुकीवर...
Skip to content