Homeहेल्थ इज वेल्थडॉक्टरांनो, आता पीपीई...

डॉक्टरांनो, आता पीपीई सूट वापरा हवेशीर!

आपले कर्तव्य बजावताना दीर्घकाळ पीपीई सूटमध्ये घाम गाळणाऱ्या डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. पुण्यातल्या एका स्टार्टअपने पीपीई किट्ससाठी विकसित केलेल्या एका सुटसुटीत, किफायतशीर वायुवीजन प्रणालीमुळे अशा किट्स परिधान केल्यावर येणारा अतिरिक्त घाम रोखता येईल.

पारंपारिक पीपीई किट्समध्ये एका साध्या बदलासह जोडलेली वायुवीजन प्रणाली शरीराला आराम देते तसेच बुरशीजन्य आजारांनादेखील प्रतिबंध करते. मुंबईच्या आदर्श, या अभियांत्रिकी शाखेतील निहाल सिंग आदर्श यांनी  त्यांच्या वॅट टेकनोव्हेशन्स स्टार्टअपद्वारे सोमैया विद्याविहार विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या सहाय्याने (एनएसटीईडीबी), आरआयआयडीएल (रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाईन लॅबोरेटरी) येथे ‘कोव्ह-टेक व्हेंटिलेशन सिस्टम’ नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

के जे सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि वॅट टेक्नोव्हिएशनचे संस्थापक निहाल सिंग आदर्श यांना एनआयडीएचआयच्या प्रमोटिंग अँड एक्सेलरेटिंग यंग अँड ऍस्पायरिंग टेक्नॉलॉजी उद्योजकांना (प्रयास) विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून प्रोटोटाइप विकास आणि उत्पादनासाठी 10,00,000 रुपये अनुदान मिळाले. आरआयआयडीएल आणि के जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या नवीन उद्यम गुंतवणुकीच्या कार्यक्रमातून सहाय्य म्हणून 5,00,000 रुपयेदेखील या स्टार्टअपला मिळाले आहेत.

पारंपारिक पीपीई सूटवर कमरेवर साध्या पट्ट्याप्रमाणेच ‘कोव्ह-टेक व्हेंटिलेशन सिस्टम’ घट्ट बांधता येते आणि कोविडबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी रूग्णालयात कार्यरत डॉक्टर आणि वैद्यकीय चिकित्सकांना यामुळे आराम मिळू शकेल. या वेंटिलेशन प्रणालीची रचना  पीपीई किटमधून संपूर्ण हवा बंद राहील हे सुनिश्चित करते. हे केवळ 100 सेकंदांच्या अंतराने वापरकर्त्याला ताज्या हवेची झुळूक देते.

पुण्यातल्या दसॉं सिस्टीम्स येथील अत्याधुनिक प्रोटोटाइप सुविधेत विकसित केलेल्या या उत्पादनास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. आरआयआयडीएलच्या सल्लागार आणि तज्ज्ञांच्या पथकाने स्टार्टअपला सहाय्य पुरवले असून प्रत्येक टप्प्यावर त्यांना अनुकूल वातावरण  पुरवण्यास  मदत केली, जेणेकरून नवसंशोधकांना सर्वोत्कृष्ट उत्पादन देण्यात मदत होईल, असे आरआयआयडीएलचे गौरांग शेट्टी म्हणाले.

पीपीई सूटसाठी वायुवीजन यंत्रणा प्रदान करण्यासाठी सुटसुटीत, पोर्टेबल आणि वापरण्यास सुलभ असे हे उपकरण आहे. पुण्याच्या साई स्नेह रुग्णालय आणि लोटस मल्टि-स्पेशॅलिटी रुग्णालयात कोवटेक व्हेंटिलेशन प्रणाली वापरली जात आहे. जूनपर्यंत याची व्याप्ती वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content