Homeहेल्थ इज वेल्थकोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी...

कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी पूर्वी घेतलेली वेळ कायम!

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आता ८४ दिवसांचे अंतर करण्यात आले असले तरी याआधी ज्या नागरिकांनी लसीच्या दुसऱ्या डोससाठी पूर्वी वेळ घेतली असेल तर ती रद्द होणार नाही. मात्र, या व्यक्तींनी स्वतःहून ही वेळ बदलून ८४ दिवसांनंतरची घ्यावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य खात्याने केले आहे.

हा संबधित बदल कोविन पोर्टलवर आता समाविष्ट केला आहे. त्यामुळे यापुढे पहिली मात्रा घेणाऱ्यांना ८४ दिवसांपेक्षा कमी दिवसांत दुसऱ्या मात्रेसाठी ऑनलाईन वा ऑनसाईट वेळ मिळू शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी आधी घेतलेली वेळ मात्र तशीच कायम  राहील. ती कोविनकडून परस्पर रद्द होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासोबतच, या लाभार्थ्यांनी दुसऱ्या मात्रेसाठी घेतलेली वेळ बदलून ती पहिल्या मात्रेपासून ८४ दिवसांनंतरची घ्यावी असे सुचवण्यात आले आहे.

कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी आधीच्या वेळेनुसार जे आले आहेत त्या लाभार्थ्यांना परत न पाठवता त्यांना दुसरी मात्रा देण्याच्या सूचना आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात असे निर्देश,  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. परंतु, कालावधीतील बदलाबद्दल देखील लाभार्थ्यांना योग्य माहिती देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड कार्यगटाने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रेमधील कालावधी १२ ते १६ आठवडे करण्याची सूचना केली आहे. ही सूचना केंद्र  सरकारने १३ मे २०२१ रोजी स्वीकारली आहे. केंद्र सरकारने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना या बदलांबद्ल माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसींच्या दोन मात्रांमधील अंतर १२ ते १६ आठवडे दर्शवण्याच्या दृष्टीने कोविन डिजिटल पोर्टलमध्ये बदल करण्यात आला आहे.

मात्र, काही माध्यमातून कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या आणि ८४ दिवसांपेक्षा कमी कालावधी राखून ज्यांनी दुसऱ्या मात्रेसाठी वेळ ठरवून घेतली आहे, त्यांना दुसरा डोस न देता लसीकरण केंद्रावरून परतवण्यात आले, अशा आशयाचे वृत्त देण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने हे स्पष्टीकरण केले आहे. हा संबधित बदल कोविन पोर्टलवर आता समाविष्ट केला आहे. त्यामुळे यापुढे पहिली मात्रा घेणाऱ्यांना ८४ दिवसांपेक्षा कमी दिवसात दुसऱ्या मात्रेसाठी ऑनलाईन वा ऑनसाईट वेळ मिळू शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी या कालावधीतील बदलाआधी मिळालेल्या पूर्वनियोजित वेळेचा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी आदर करावा अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे .

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content