Homeएनसर्कलनिवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्राची देशभरात...

निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्राची देशभरात विशेष मोहीम सुरू!

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने विभागात तसेच केंद्र सरकारी निवृत्तीधारकांच्या संस्थांमार्फत देशभरात 3.0 ही विशेष मोहीम सुरू केली आहे. 15 सप्टेंबर 2023पासून मोहिमेचा प्राथमिक टप्पा सुरू झाला. मोहिमेदरम्यान साध्य करण्यासाठी लक्ष्य ठरवण्यासाठीचा हा टप्पा होता. मुख्य मोहीम दोन ऑक्टोबर 2023पासून सुरू झाली आणि ती 31 ऑक्टोबर 2023पर्यंत चालेल.

यामध्ये प्रलंबित गोष्टींचा निपटारा, स्वच्छतेची सवय बाणवणे, अंतर्गत व्यवस्थापन पद्धती बळकट करणे, नोंदी व्यवस्थापनात सुधारणा यावर भर राहील.

या विशेष मोहिमेच्या तयारीच्या टप्प्यात विभागाने आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीधारक संघटनेने देशभरात 50 स्वच्छतास्थळे ठरवली.

आतापर्यंत लक्ष्य निर्धाराच्या बाबतीत उत्तम यश मिळालेले आहे. यावर्षी पाच हजार सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि 600 सार्वजनिक तक्रार अपीलांचे निवारण करण्याचे लक्ष्य विभागाने निश्चित केले आहे. 1358 फाईल्स या मोहिमेदरम्यान पुनर्आढाव्यासाठी निश्चित करण्यात आल्या आणि 883 इलेक्ट्रॉनिक फाईल बंद करण्यासाठी निश्चित केल्या गेल्या. या मोहिमेबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकृत समाज माध्यम हँडलवर आधी व्ट्विटर आणि आता एक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाज माध्यमांवर पन्नासहून अधिक संदेश दिले गेले. ठराविक काळासाठी विभागाने निश्चित केलेले लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने ही मोहीम पूर्ण वेगाने सुरू आहे.

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content