Homeएनसर्कलपहिल्या नऊमाहीत ऑडी...

पहिल्या नऊमाहीत ऑडी कारच्या विक्रीत 88% वाढ!

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने या वर्षाच्‍या पहिल्‍या नऊमाहीत ५,५३० युनिट्सची विक्री करत विक्रीमध्‍ये ८८ टक्‍क्‍यांची वाढ केल्‍याची घोषणा केली आहे. नवीन ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू३ व ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅकच्‍या लाँचसह ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू५ आणि टॉप-ऑफ-द-लाइन कार्स ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी ए८ एल, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी ई-ट्रॉन जीटी व ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी यांच्‍यासाठी सतत होत असलेल्‍या मागणीमुळे सकारात्‍मक वाढ झाली आहे. याच कालावधीमध्‍ये एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये मोठी १८७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे आणि परफॉर्मन्स व लाइफस्‍टाइल कार्ससह ई-ट्रॉन श्रेणीमध्‍ये ४२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ऑडी इंडियाने ५,५३० युनिट्सची विक्री करत प्रबळ ८८ टक्क्यांच्‍या वाढीची नोंद केली. तसेच आमच्‍या एसयूव्‍हींमध्‍ये १८७ टक्‍क्‍यांची प्रबळ वाढ दिसण्‍यात आली आहे.

आगामी सणासुदीच्‍या काळासह आम्‍हाला आमच्‍या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्स जसे ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, क्‍यू५, ऑडी क्‍यू७ व ऑडी क्‍यू८ साठी मागणी कायम राहण्‍यासह ही वाढ सुरू राहण्‍याची अपेक्षा आहे. आमच्‍या नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या कार्स ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन (उद्योगामध्‍ये सर्वोत्तम असलेल्‍या प्रभावी ११४ केडब्ल्‍यूएच बॅटरीसह ऑफर करण्‍यात आलेली) यांसह आमचा विभागातील सर्वात मोठा ईव्‍ही पोर्टफोलिओ आहे. आम्‍हाला सणासुदीच्‍या काळादरम्‍यान आमच्‍या इलेक्ट्रिक श्रेणीसाठी उत्तम मागणी मिळण्‍याचा विश्‍वास आहे, ज्‍यामध्‍ये भारतातील पहिल्‍या ईव्‍ही सुपरकार्स-ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी यांचा देखील समावेश आहे.

मोठी मागणी, लक्‍झरी कार विभागामधील विस्‍तारीकरण, सर्वसमावेशक डेमो‍ग्राफिक्‍स आणि अनुकूल आर्थिक स्थितींमुळे प्रबळ विक्री कामगिरी वाढीला साह्य करत आहे. आज, प्रत्‍येकी चारपैकी एक ग्राहक रिपीट ऑडी ग्राहक आहे, ज्‍यामधून आमच्‍या निदर्शनास येते की ग्राहक आनंदी आहेत. आम्‍ही विकासाच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत, जेथे शाश्‍वतता, लाभदायी व्‍यवसाय आमचे धोरण आहे आणि आम्‍हाला उच्‍च दोन-अंकी वाढीसह वर्षाची सांगता होण्‍याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

जानेवारी ते सप्‍टेंबर २०२३ कालावधीत ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस (पूर्व-मालकीचा कार व्‍यवसाय) ६३ टक्‍क्‍यांनी वाढला. ऑडी इंडियाने भारतातील आपला पूर्व-मालकीचा कार व्‍यवसाय ऑडी अप्रूव्‍ह्ड प्‍लसचे विस्‍तारीकरण सुरू ठेवले आहे. सध्‍या देशातील सर्व प्रमुख ठिकाणी २५ ऑडी अप्रूव्‍ह्ड प्‍लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्‍ड विस्‍तार करत आहे आणि २०२३ च्‍या अखेरपर्यात २७ पूर्व-मालकीच्‍या कार सुविधा असतील.

इलेक्ट्रिफिकेशन धोरणाला अधिक पुढे नेत ऑडी इंडियाने नुकतेच ईव्‍ही मालकांसाठी उद्योगातील पहिला उपक्रम ‘मायऑडीकनेक्‍ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’ची घोषणा केली. हे एक-थांबा सोल्‍यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपवर विविध इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती देते. सध्‍या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी १००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्‍ध आहेत, ज्‍यामध्‍ये पुढील काही महिन्‍यांत अधिक भर होईल.

ऑडी इंडिया उत्‍पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू५, ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन ५०, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन ५५, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.

Continue reading

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...

‘कोटक सिक्युरिटीज’ने सुचविले काही धमाकेदार दिवाळी शेअर्स!

"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक या ब्रोकरेज हाऊसने शॉर्टलिस्ट केले आहेत. अदानी पोर्ट्स-सध्याची किंमत (CMP): ₹ 1,419पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट: ₹ 1,900गुंतवणुकीवर...
Skip to content