Homeएनसर्कलआता स्वीडनमध्येही वाजला...

आता स्वीडनमध्येही वाजला ढोल-ताशा!

स्वीडनमध्ये पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाची सुरुवात झाली आहे. स्वीडनमधील गणेश मंदिरातील आमच्या पहिल्याच परफॉर्मन्सला अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. स्टॉकहोममधील ढोल-ताशा पथकाचे संस्थापक अभिनय सरकटे आहेत आणि गोथेनबर्गमध्ये प्रणाली मानकर यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले. त्यांनी एकत्रितपणे ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केले आहे. त्याद्वारे हा परफॉर्मन्स करण्यात आला.

गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त आमच्या पथकाने सलग 2 तास धमाकेदार परफॉर्मन्स केला. भाविकांनी त्याला जोरदार प्रतिसाद देत, बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेल्या आमच्या पथकाच्या खास पेहरावाने स्वीडिश भूमीवर आपल्या भारतीय परंपरेचा सुंदर अनुभव दिला.

आमच्या पथकाचा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे. सातासमुद्रापार आम्ही आमच्या सांस्कृतिक समृद्धीचा प्रसार करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत, असे प्रणाली मानकर यांनी सांगितले.

Continue reading

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...

मंगळवार-बुधवारी अंधेरी ते वांद्रे भागात विस्कळीत पाणीपुरवठा

मुंबई महापालिकेकडून जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, ११ ऑगस्‍टला सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्‍टला सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा...
Skip to content