Homeकल्चर +‘प्राचीन भारतातील सागरी...

‘प्राचीन भारतातील सागरी युद्ध मोहिमा’ कळल्या व्याख्यानातून! 

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने अॅडमिरल दिवंगत एमपी आवटी यांच्या स्मरणार्थ अगस्त्य सभागृह, आयएनएचएस अश्विनी येथे तिसरे वर्षाकालीन व्याख्यान नुकतेच आयोजित केले होते. लेखक, इतिहासकार आणि संशोधन अभ्यासक वेंकटेश रंगन या कार्यक्रमाचे अतिथी वक्ते होते. ‘प्राचीन भारतातील सागरी युद्ध मोहिमा’ या विषयावरील व्याख्यानात, रंगन यांनी भारताने प्राचीन काळात राबवलेल्या, धोरणात्मक सागरी युद्ध मोहिमांवर भाष्य केले.

या मोहिमा सध्याच्या काळासाठीही बोधकारक ठरतील. व्याख्यानात त्यांनी प्राचीन काळातील दोन भारतीय सागरी युद्ध मोहिमांवर त्यांनी विस्तृत माहिती दिली. यामध्ये अकराव्या शतकात चोल सम्राट राजेंद्र चोल याने मिळवलेला विजय आणि अल-फॉ द्वीपकल्पामधील भारतीय समुदायाचे रक्षण करण्यासाठी चालुक्य सम्राटाने राबवलेल्या सागरी युद्ध मोहिमांचा समावेश होता. व्याख्यानामध्ये प्राचीन काळातही अस्तित्वात असलेल्या प्रभावी सागरी धोरणांचे महत्व, आणि सध्याच्या काळातील नौदलाच्या यशस्वी मोहिमा आणि धोरणात्मक निर्णयांवरील त्याचा प्रभाव, यावर भर देण्यात आला.

व्हाइस अॅडमिरल राजाराम स्वामीनाथन, एव्हीएसएम, एनएम, डीजीएनपी (मुंबई) यांनी अतिथी वक्ते वेंकटेश रंगन यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला नौदल कर्मचारी, इतिहासकार, विद्यार्थी आणि सागरी क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, असा वैविध्यपूर्ण श्रोतृगण लाभला.

व्याख्यानाचे रेकोर्डिंग मेरीटाइम हिस्ट्री सोसायटीच्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट केले जाईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content