Homeमुंबई स्पेशलश्री गणेश मूर्तींवर...

श्री गणेश मूर्तींवर शिक्का मारू नका!

मूर्ती कशाचीही असली तरी श्री गणेशाच्या मूर्तींवर कोणत्याही स्वरूपाचा शिक्का मारला जाऊ नये ही भाविकांच्या वतीने समन्वय समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या मागणी मुंबई महापालिकेने मान्य केली असून तशा सूचना सर्व श्री गणेश मूर्तीकारांना दिल्या आहेत.

पर्यावरणपूरक मूर्तींना ओळखता यावे म्हणून पालिका प्रशासनाने अशा मूर्तींवर शिक्का मारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्रशासनामार्फत सुरुवातीलाच आयोजित विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय बैठकीत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या ओळखीसाठी ‘मार्क’ करण्याचा विषय चर्चेला आला होता. गणेशोत्सवाच्या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीतच सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. याच बैठकीत श्री गणेश मूर्तींवर शिक्का मारला जाऊ नये, अशा सूचना प्रशासनामार्फत मूर्तीकारांना त्यावेळीच देण्यात आल्या होत्या.

आता मूर्तीकारांनीही या सुचनेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.  

Continue reading

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...
Skip to content