मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवारी, १० सप्टेंबर २०२३ या दिवशी सायंकाळी पाच वाजता डॉ. पौर्णिमा धुमाळे यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना तबल्याची साथ तेजोवृष जोशी आणि संवादिनीची साथ सिद्धेश बिचोलकर करतील. हा कार्यक्रम कै. नाना आणि भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी प्रायोजित केला आहे.

डॉ. पौर्णिमा धुमाळे या आग्रा घराण्याच्या प्रतिभावंत गायिका असून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई किराणा घराण्याच्या गायिका डॉ. सुलभाताई ठकार यांच्याकडे घेतलं. त्यानंतर त्यांनी १५ वर्षे आग्रा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. बबनराव हळदणकर यांच्याकडे सखोल तालीम घेतली. त्या सध्याच्या काळातील आग्रा घराण्याच्या आघाडीच्या अष्टपैलु गायिका कलाकार आहेत. त्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या ‘ए’ ग्रेड कलाकार असून शास्त्रीय संगीताबरोबर उपशास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम करत असतात. सध्या त्या एसएनडीटी विद्यापीठ पुणे, येथे संगीत विभागच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

