Homeएनसर्कलजया वर्मा सिन्हा...

जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा!

रेल्वे बोर्डाच्या (रेल्वे मंत्रालय) नव्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून जया वर्मा सिन्हा यांनी रेल्वे भवन येथे नुकताच पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने रेल्वे बोर्डाच्या (रेल्वे मंत्रालय) नव्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून जया वर्मा सिन्हा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. भारतीय रेल्वेच्या या सर्वोच्च पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

याआधी जया वर्मा सिन्हा यांनी रेल्वे बोर्डामध्ये सदस्य (ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट) म्हणून काम केले आहे. भारतीय रेल्वेवरील मालवाहतूक आणि प्रवासी सेवांच्या एकूण वाहतुकीची जबाबदारीही सिन्हा यांच्यावर होती.

जया वर्मा सिन्हा 1988 मध्ये भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत (आयआरटीएस) रुजू झाल्या. भारतीय रेल्वेतील 35 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी रेल्वे बोर्डात सदस्य (ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट), अतिरिक्त सदस्य, (रहदारी (ट्रॅफिक) आणि वाहतूक) अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तसेच, जया वर्मा सिन्हा यांनी ऑपरेशन्स, कमर्शियल, आयटी आणि व्हिजिलन्स अशा विविध विभागांमध्येही काम केले आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या प्रधान मुख्य ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी ढाका, बांगलादेश येथील भारतीय उच्चायुक्तालयात रेल्वे कामकाज सल्लागार म्हणून काम केले होते, त्यांच्याच या कार्यकाळात कोलकाता ते ढाका या प्रसिद्ध मैत्री एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले होते.

जया सिन्हा अलाहाबाद विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना फोटोग्राफीची आवड आहे.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content