Homeकल्चर +'महेंद्रगिरी'चे उद्या मुंबईत...

‘महेंद्रगिरी’चे उद्या मुंबईत जलावतरण!

महेंद्रगिरी या प्रोजेक्ट 17A श्रेणीतील शेवटच्या युद्धनौकेचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 23 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई इथे जलावतरण केले जाईल.

महेंद्रगिरी हे नाव ओरिसा राज्यात स्थित पूर्व घाटातील पर्वत शिखरावरून देण्यात आले असून प्रोजेक्ट 17A श्रेणीतील सातवी युद्धनौका आहे. या युद्धनौका प्रोजेक्ट 17 श्रेणी (शिवालिक श्रेणी) मधील असून त्यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. नव्याने नामकरण केलेली महेंद्रगिरी ही तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे आणि स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या भविष्याकडे वाटचाल करत असताना ती समृद्ध नौदल वारसा अंगिकारण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे.

प्रोजेक्ट 17A कार्यक्रमांतर्गत, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून एकूण चार जहाजे आणि जीआरएसई कडून तीन जहाजांची निर्मिती केली जात आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि जीआरएसई यांनी 2019-2023 दरम्यान टायर केलेल्या या श्रेणीतील सहा युद्धनौकांचा आतापर्यंत नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.

युद्धनौका डिझाइन क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने प्रोजेक्ट 17A जहाजांची रचना केली आहे. ‘आत्मनिर्भारते’च्या देशाच्या दृढ वचनबद्धतेला अनुरूप, प्रकल्प 17A जहाजांच्या उपकरणे आणि प्रणालींसाठी 75% सामग्री स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी करण्यात आली आहेत, ज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) यांचा समावेश आहे. महेंद्रगिरी युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश होणे भारताने, आत्मनिर्भर नौदलाच्या उभारणीत केलेल्या अतुलनीय प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content