Homeकल्चर +अभिनेता कार्तिकेय मालवीया...

अभिनेता कार्तिकेय मालवीया मराठी सिनेसृष्टीत!

हिंदी मालिका विश्वातील नावाजलेला अभिनेता कार्तिकेय मालवीया त्याच्या विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध आहे. चंद्रगुप्त मौर्य, कर्मफलदाता शनी, राधा कृष्णा या मालिकांनंतर आता तो ‘रागिनी’ या मराठी म्युझिक अल्बमद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सचिन कांबळे दिग्दर्शित ‘रागिनी’ या गाण्यासाठी अभिनेत्री सई कांबळे आणि अभिनेता कार्तिकेय मालवीया हे ७ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. हे दोघेही ७ वर्षांपूर्वी इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

अभिनेता कार्तिकेय मालवीया त्याच्या पहिल्यावहिल्या म्युझिक अल्बमविषयी सांगतो की, हा माझा पहिलाच म्युझिक अल्बम आहे आणि त्यात मराठी भाषेत आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. कारण मला मराठी बोलता येत नाही. पण थोडेफार शब्द कळतात. मी सेटवर शूटिंग करताना मराठी गाणं गुणगुणत होतो. पण कधीकधी शब्द चुकत होते. त्यामुळे सेटवर सगळे हसत होते. परंतु आम्ही सगळ्यांनी सेटवर खूप धम्मालमस्ती केली. सचिन सरांनी मला हे गाणं करण्याची संधी दिली. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार!

अभिनेत्री सई कांबळे चित्रिकरणाचा किस्सा सांगताना म्हणते की, मला फार मजा आली शूट करताना. कारण, हे माझं पहिलं गाणं आहे, ज्यात मी लीड एक्ट्रेस आहे. हेवी आऊटफीटमध्ये नृत्य करणं हे फार चॅलेंजिंग होतं. आणि माझे वडील सचिन कांबळे या गाण्याचे दिग्दर्शन करत होते. त्यामुळे मी या गाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. कार्तिकेय आणि मी ७ वर्षांनंतर भेटत होतो. आम्ही रिॲलिटी शोमध्ये असताना सोबत नाश्ता आणि रिअर्सल करायचो. तिथे आम्ही कॉम्पीटीटर होतो. पण या गाण्यात आम्ही लीड होतो. त्यात या गाण्याचं शूटिंग एका दिवसात पार पडलं. तरी आम्ही खूप मजा केली.

दिग्दर्शक सचिन कांबळे ‘रागिनी’ या गाण्याविषयी सांगतात की, मी आतापर्यंत आपली यारी, मी नादखुळा, आपलीच हवा, चिंतामणी माझा, माझी ताई अशा ५०हून अधिक म्युझिक अल्बमचं दिग्दर्शन केलं आहे. काही गाण्यांची कोरिओग्राफीसुद्धा मी केलीय. मला खूप दिवसांपासून एनर्जेटीक आणि डान्सीकल गाणं करण्याची इच्छा होती. म्हणूनच आम्ही ‘रागिनी’ हे गाणं‌ करण्याचा विचार केला. सई आणि कार्तिकेय हे दोघेही इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिॲलिटी शोमध्ये एकमेकांचे कॉम्पीटीटर जरी असले तरी त्यांची छान मैत्री होती. ‘रागिनी’ गाण्यातदेखील त्यांची रिअल बॉन्डिंग चांगल्याप्रकारे दिसून आले आहे. रागिनी हे गाणं आरती पाठक हिने लिहीले असून गायक मधूर शिंदे आणि गायिका अंशिका चोणकर यांनी गायले आहे. संगीत संयोजन आशिष पडवळने केले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. असंच प्रेम कायम असू द्या!

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content