Homeकल्चर +शुक्रवारी फक्त २५...

शुक्रवारी फक्त २५ रुपयांत अनुभवा ‘एक झुंज वाऱ्याशी’!

‘एक झुंज वाऱ्याशी’, या अत्यंत गाजलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या नाटकाचा २५वा प्रयोग येत्या शुक्रवारी, २५ ऑगस्टला मुंबईतल्या प्रेक्षकांना अवघ्या २५ रुपयांत पाहता येणार आहे.

“सत्तेत असणाऱ्या माणसांनी प्रामाणिक असायला हवं”, “छोट्याशा गोष्टीसाठी न्याय मागतानाही भीमाचं बळ लावावं लागतं आपल्याला…” स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही आपल्याकडे आजही तशीच परिस्थिती आहे. आजही माणसं बदलली तरी संदर्भ तेच आहेत. अशावेळी एक सामान्य माणूस आपला काहीही संबंध नसताना, तिसऱ्या कुणावर झालेल्या अन्यायासाठी पेटून उठतो…

सामान्य माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देऊ पाहणारं पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेलं एक दमदार नाटक अवघ्या २५ रुपयांत नाट्यरसिकांना पाहायला मिळणार आहे. व्हिजन निर्मित, एक झुंज वाऱ्याशी, नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग शुक्रवार, २५ ऑगस्ट, रात्रौ ८.१५ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे रंगणार आहे. सुप्रिया प्रॉडक्शन्स, यांच्या सहयोगाने या नाटकाचे हे प्रयोग होत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे. आजपर्यंत अनेक नाट्यसमीक्षकांनी गौरवलेले हे नाटक अलीकडच्या काळातील नाट्यरसिकांनी आवर्जून पाहावे, असे आवाहन सुप्रिया प्रॉडक्शनच्या सुप्रिया चव्हाण यांनी केले आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content