Homeकल्चर +पाहा इवल्याश्या बोटांची...

पाहा इवल्याश्या बोटांची जादुगिरी…

हल्ली मूल दोन वर्षांचेही झाले नाही तोच त्याच्या वा तिच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी अनेक प्रि प्रायमरी शैक्षणिक संस्था उत्सुक असतात. विविध प्रकारच्या स्पर्धा, खेळ, कविता, गाणी, अक्षरओळख, रंगओळख असे अनेक उपक्रम या व्यावसायिक प्रि प्रायमरी शैक्षणिक संस्था त्यांच्या-त्यांच्या शाळांमधून राबवत असतात. अशाच एका शाळेने पुण्यातल्या हिंजवडी परिसरात पावसाळ्याचे औचित्य साधत छत्री रंगवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. बालकांनी त्यांच्या पालकांच्या सहाय्याने छत्र्या रंगवायच्या होत्या. त्यात अवनी दामले, या अडीच वर्षांच्या चिमुकलीने पालकांच्या प्रत्यक्ष मदतीशिवाय संपूर्ण छत्री रंगवत आपल्या बोटांची जादुगिरी दाखवली. त्याची ही काही क्षणचित्रे…

जादुगिरी
जादुगिरी

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content