Homeकल्चर +तूच हो तुझ्या...

तूच हो तुझ्या साहित्याचा प्रकाशक!

सोशल मीडिया हे लेखकांसाठी मोठेच वरदान ठरत आहे. उत्तमोत्तम पोस्ट्स, आठवणी, विचारप्रवर्तक लेख, अनुभव कथन, ललित लेख आणि सामाजिक चिंतनविषयक लेखन करणारे शेकडो गुणवंत लेखक आपल्याला फेसबुक, ब्लॉग्ज, इन्स्टाग्राम वगैरे माध्यमातून दररोज भेटतात. त्यांचे हे लेखन पुस्तक रूपाने आणण्यासाठी पुरेसे प्रकाशक आज समाजात नाहीत. नवलेखक कितीही गुणवंत असो आणि त्याचे किंवा तिचे लिखाण कितीही दर्जेदार असो त्यांना प्रकाशकांकडून नकार ऐकावा लागतो. ती दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्यासाठी आज जगभरात लोकप्रिय असलेला मार्ग म्हणजे सेल्फ पब्लिशिंग, अर्थात लेखकाने आपले पुस्तक स्वतःच प्रकाशित करणे. याचाच अर्थ तूच हो तुझ्या साहित्याचा प्रकाशक…

संगणक प्रकाशनने नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक ‘प्रकाशन : तंत्र आणि मंत्र’, हे माधव शिरवळकरलिखित पुस्तक सेल्फ पब्लिशिंगसाठीचे परिपूर्ण गाईड आहे. एकूण ३०४ पाने आणि २१ प्रकरणे असलेल्या या पुस्तकात लेखन, बुक डिझाईन, पेजिनेशन, छपाई, ऑनलाईन विक्री, वितरण, जाहिरात, प्रचार, ISBN नोंदणी, कॉपीराईट कायदा आदिंविषयी सर्वसमावेशक व अद्ययावत माहिती आहे. पुस्तक प्रकाशक, लेखक, मुद्रक आणि पत्रकारिता व मास मrडियाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, असे हे पुस्तक ‘ॲमेझॉन’वर उपलब्ध आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content