स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके काल जाहीर करण्यात आली आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठीदेखील पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 17 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील तुरुंग कर्मचाऱ्यांची यादी
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक
1. सुनील धमाल, अतिरिक्त अधीक्षक वर्ग 1
2. प्रकाश उकरंडे, जेलर ग्रुप 1
3. तात्यासाहेब निंबाळकर, जेलर ग्रुप 1
4. आनंद हिरवे, सुभेदार
5. गणेश घोडके, हवालदार
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक
1. अनिल खामकर, अधीक्षक वर्ग 1
2. वामन निमजे, जेलर गट 1
3. विजय कांबळे, जेलर ग्रुप 1
4. तानाजी धोत्रे, जेलर ग्रुप 2
5. किशोरीलाल रहांगडाले, सुभेदार
6. विजय पाटील, सुभेदार
7. प्रकाश सातपुते, सुभेदार
8. चंद्रकांत बोसोडे, सुभेदार
9. बाबासाहेब चोरगे, हवालदार
10. दत्तात्रय भोसले, हवालदार
11. अशोक आडाळे, शिपाई
12. सुधाकर माळवे, शिपाई