Homeमुंबई स्पेशलमंत्रालयात मुख्यमंत्री तर...

मंत्रालयात मुख्यमंत्री तर पुण्यात राज्यपाल करणार ध्वजारोहण!

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७६वा वर्धापनदिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस हे ध्वजारोहण करणार आहेत.

जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजित शासकीय समारंभात करण्यात येणाऱ्या ध्वजारोहणासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले. त्यात हे स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.

अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे–

अमरावती- छगन भुजबळ

चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

रायगड- चंद्रकांत पाटील

वाशिम- दिलीप वळसे-पाटील

अहमदनगर- राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक- गिरीष महाजन

धुळे- दादाजी भुसे

जळगाव- गुलाबराव पाटील

ठाणे- रविंद्र चव्हाण

सोलापूर- हसन मुश्रीफ

सिंधुदूर्ग- दीपक केसरकर

रत्नागिरी- उदय सामंत

परभणी- अतुल सावे

औरंगाबाद- संदीपान भुमरे

सांगली- सुरेश खाडे

नंदुरबार- विजयकुमार गावीत

उस्मानाबाद- तानाजी सावंत

सातारा- शंभूराज देसाई

जालना– अब्दुल सत्तार

यवतमाळ- संजय राठोड

बीड– धनंजय मुंडे

गडचिरोली– धर्मराव अत्राम

मुंबई उपनगर– मंगलप्रभात लोढा

लातूर– संजय बनसोडे

बुलढाणा– अनिल पाटील

पालघर– अदिती तटकरे

हिंगोली– जिल्हाधिकारी हिंगोली

वर्धा– जिल्हाधिकारी वर्धा

गोंदिया– जिल्हाधिकारी गोंदिया

भंडारा– जिल्हाधिकारी भंडारा

अकोला– जिल्हाधिकारी अकोला

नांदेड– जिल्हाधिकारी नांदेड

कोकण भवन येथे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content