३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून आज महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, पृथ्वीराज साठे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, नरेंद्र वर्मा, देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, संदीप पांडे उपस्थित होते.



