Homeकल्चर +उर्मिला निंबाळकरच्या आवाजातले...

उर्मिला निंबाळकरच्या आवाजातले तिसरे ‘पेटलेलं मोरपीस’ प्रदर्शित!

गावातली सरपंचाची मुलगी स्वतःच्या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडते. इतकंच नाही आपलं हे नातं जगासमोर जाहीर करून मानाने जगायचं ठरवते. तेव्हा गावामध्ये जो काही हलकल्लोळ माजतो आणि त्यात गावामध्ये निवडणुका येतात आणि त्याचा सर्वचजण राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. अशी आगळीवेगळी ऑडिओ कादंबरी नितीन थोरातलिखित पेटलेलं मोरपीस, पाच वर्षांपूर्वी स्टोरीटेलवर सादर झाली होती. प्रसिद्ध अभिनेत्री आणि सध्याची आघाडीची यूट्यूबर उर्मिला निंबाळकर यांच्या आवाजात. ही ऑडिओ कादंबरी सर्वाधिक गाजली. त्यामुळे त्याचा दुसरा सिझनही दोन वर्षांपूर्वी रिलीज करण्यात आला आणि या आठवड्यात याच कादंबरीचा तिसरा सिझन प्रकाशित झाला आहे.

या दोघींची प्रेमकहाणी इतकी उत्कट आहे की आपण त्यात इतके गुंतत जातो आणि विसरून जातो की त्या दोघीही मुली आहेत. त्यांचे संबंध समलैंगिक आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने लिंगभेदाच्याही पुढे जाणारी ही प्रेमकथा आहे, जी आपल्याला फक्त माणूस म्हणून विचार करायला भाग पाडते. मी स्वतःला भाग्यवान समजते की, इतक्या उत्तम कादंबरीचा आवाज मला होता आलं. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातली असून माझं नववीपर्यंतचं शालेय शिक्षण गावात झालं. त्यामुळे ग्रामीण लहेजा खूप चांगल्याप्रकारे पकडता येतो. या कथेतली दोन मुख्य पात्र सोनी आणि माधी रंगवताना खूपच मजा आली. मला आजही सोशल मीडियावर अनेक मेसेज येतात की ही कादंबरी आम्ही सलग ऐकली म्हणून आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो. वेब सिरीजसारखं बिंज लिसनींग करून लोकं कथा संपवत आहेत, त्यावरूनच त्याच्या लिखाणाची ताकद समजून येते, असं उर्मिला निंबाळकर सांगते.

पेटलेलं मोरपीस, या कादंबरीच्या तीनही सिझनचं लिखाण प्रसिद्ध लेखक नितीन थोरात यांनी केले आहे. नितीन थोरात यांनी आतापर्यंत 17 कादंबऱ्यांचे लिखाण केले असून त्यांची पहिली कादंबरी सूर्याची सावली याला राज्यशासनाचा लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर त्यांचीच नुकतीच प्रकाशित झालेली खंडोबा कादंबरीही विशेष गाजली. नितीन थोरात यांनी स्टोरीटेलवर सात ऑडिओ कादंबऱ्या आणि अनेक ऑडिओ लघुकथांचे लेखन केले आहे. स्टोरीटेलवरच्या मराठी लेखकांमध्ये सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या टॅाप टेन लेखकांच्या यादीतही ते आहेत. पेटलेलं मोरपीसचा तिसरा सिझनही पहिल्या दोन सिझनसारखा श्रोत्यांच्या पसंतीस पडेल असे नितीन थोरात सांगतो.

पेटलेलं मोरपीस.. ऐकण्यासाठी खालील लिंक-

https://www.storytel.com/in/books/petlela-morpis-se03e01-2531061

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content