Homeमुंबई स्पेशलसिलिकॉन व्हॅलीत करा...

सिलिकॉन व्हॅलीत करा एआय क्षेत्रातला अभ्यास!

फिजिक्सवाला (पीड्ब्ल्यू) या भारताच्या आघाडीच्या एज्युटेक प्लॅटफॉर्मने पीडब्ल्यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन (पीडब्ल्यू आयओआय) या कॉम्प्युटर सायन्स आणि एआयच्या क्षेत्रातील ४ वर्षीय निवासी अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाला भेडसावणाऱ्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी याची स्थापना भारताच्या सिलिकॉन व्हॅली म्हणजे बंगळुरूमध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक सुसंगत कौशल्ये देऊन आणि व्यावसायिकांच्या मागणी व पुरवठ्यातील अंतर व रोजगारक्षमता अंतर साधण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

हा चार वर्षीय पूर्णपणे निवासी अभ्यासक्रम शिक्षणाप्रति एक खास आणि सर्वांगीण दृष्टीकोन देतो. अनुभवी शिक्षकवर्ग तसेच सर्वोच्च कंपन्यांमधील नेते प्रशिक्षक म्हणून असलेल्या, उद्योगाधारित अभ्यासक्रम, १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि खऱ्या जगातील प्रकल्प यांनी युक्त या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासात यशस्वी होण्यासाठी सज्ज केले जाते. वैयक्तिक मार्गदर्शन, चार सर्वांगीण इंटर्नशिप्स, नेटवर्किंगच्या संधी, जागतिक संधी आणि अद्ययावत कॅम्पसमुळे उपक्रमाचा प्रभाव जास्त वाढतो.

पीडब्ल्यूचे सीआयओ आणि पीडब्ल्यू आयओआयचे अध्यक्ष विश्व मोहन म्हणाले की, भारतीय सॉफ्टवेअर उद्योगात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असतानाही भारतीय अभियांत्रिकी पदवीधारकांची रोजगारक्षमता तुलनेने कमी आहे आणि मागील काही वर्षांत अत्यंत कमी वाढ झालेली आहे ही गोष्ट चिंताजनक आहे. त्याचबरोबर कौशल्याधारित एआय आणि डेटा विज्ञान व्यावसायिकांच्या मागणी पुरवठा दरीत खूप मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शैक्षणिक दृष्टीकोनात व्यापक बदल घडवून आणण्याची गरज दिसून येते. पीडब्ल्यू आयओआयकडून या समस्येवर व्यावसायिकांना वेगाने वाढणाऱ्या नोकऱ्यांच्या बाजारपेठेत रोजगारक्षम आणि प्रभावी कौशल्यांद्वारे सक्षम करून उपाय काढला जातो.

या अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ती आजच्या बदलत्या बाजारपेठांमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रवाहाशी जोडली गेली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना त्याचवेळी प्रतिष्ठित संस्थेतून बॅचलरची पदवीही घेता येते. या पदवीमुळे विद्यार्थी भारतात किंवा परदेशात शिक्षण घेण्याच्या संधी मिळवू शकतात आणि ते स्पर्धा परीक्षा देण्यासाठीही पात्र ठरतात.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content