Homeकल्चर +आशियाई युवा भारोत्तोलन...

आशियाई युवा भारोत्तोलन स्पर्धेचे उद्घाटन!

भारतात प्रथमच होत असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठ वर्ग भारोत्तोलन अजिंक्यपद क्रीडास्पर्धा 2023 चे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. या स्पर्धा ग्रेटर नोइडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात आयोजित करण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या आशियाई युवा आणि कनिष्ठ वर्ग भारोत्तोलन अजिंक्यपद क्रीडा स्पर्धांचा 5 ऑगस्ट 2023 रोजी समारोप होणार आहे.

युवा

या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 30 पेक्षा जास्त भारतीय भारोत्तोलक सहभागी होणार असून त्यापैकी अनेक खेलो इंडिया स्पर्धकांनी गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 61 पदकांची कमाई करून भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

या स्पर्धेविषयी बोलताना केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले, भारताच्या यजमानपदात या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन होत आहे आणि त्यात आशिया खंडातल्या 15 हून अधिक देशांतील 200 क्रीडापटू आणि 50 हून अधिक तांत्रिक कर्मचारी तसेच प्रशिक्षक सहभागी होत आहेत याचा मला खूप आनंद झाला आहे. अशा स्पर्धा भविष्यात क्रीडाक्षेत्रात यश मिळवण्यासाठीचा पाया आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना मी सुयश चिंततो.

भारतीय भारोत्तोलक महासंघाची प्रशंसा करत केंद्रीय मंत्री म्हणाले, इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करणे सोपे नाही हे मी जाणतो. पण इच्छा असली की मार्ग सापडतोच आणि अध्यक्ष सहदेव यादव यांच्या नेतृत्वाखालील भारोत्तोलक महासंघाने ते सिध्द करून दाखवले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी यावेळी युवा खेळाडूंना अधिकाधिक सामर्थ्यासह स्पर्धेत उतरण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कर्णम मल्लेश्वरी, मीराबाई चानू यांसारख्या विविध आदर्श भारतीय भारोत्तोलाकांच्या यशस्वी कामगिरीविषयी देखील त्यांनी सांगितले. गेल्या काही काळात विविध खेलो इंडिया स्पर्धांमध्ये तसेच इतर स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकणाऱ्या मार्टिना देवी, हर्षदा गरुड आणि धनुष लोगनाथन यांसारख्या खेळाडूंच्या नव्या पिढीचे देखील त्यांनी अभिनंदन केले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content