इ. स. १८९७ साली लिहिलेले श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचे भक्त गणेश बल्लाळ मुळेकर यांनी लिहिलेले मूळ चरित्र आता त्यांच्या भक्तांसाठी तसेच वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांच्या सान्निध्यात राहून दैनंदिन घटनांची टाचणे करून त्याआधारे लिहिलेले हे जीवनचरित्र आता त्यांचे पणतू प्रशांत केशव मुळेकर यांनी १२व्या आवृत्तीच्या रुपाने प्रकाशित केले आहे.
हे चरित्र म्हणजे स्वामी भक्तांसाठी ठेवा आहे. ते उपलब्ध होत नसल्यामुळे अखेर प्रशांत मुळेकर यांनी पुढाकार घेतला आणि त्याचे प्रकाशन केले आहे. स्वामी समर्थ यांच्या मुखातून आलेली अध्यात्म, धर्म, जीवन, भक्ती, शास्त्र, व्यवहार वगैरेसंबंधीची बोधवचने तसेच महाराजांविषयीची माहिती ठिकठिकाणांहून संकलित करून त्यांनी १८९७ साली हे गद्य जीवनचरित्र लिहिले आहे. यात अक्कलकोट स्वामींचे वास्तव्य, अनुभविक माहिती, स्वामीभक्त चोळाप्पा, बाळाप्पा आणि श्रीस्वामी भक्त परायण स्वामीसुत, आनंदनाथ महाराज, तातमहाराज, दादरचे श्री बाळकृष्ण महाराज आदींचीही माहिती आहे. हे पुस्तक सध्या एमॅझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा या ऑनलाईन स्टोअरवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेच. शिवाय इच्छुकांना अधिक माहितीसाठी प्रशांत मुळेकर यांच्याशी ९८६७७९९९१५, ७०२१२८६००७ वर संपर्क साधता येईल.

