Homeकल्चर +'दिल मलंगी'मध्ये बघा...

‘दिल मलंगी’मध्ये बघा चिन्मय उद्गीरकर व नक्षत्रा मेढेकरला!

अत्यंत मनमोहक कथाकल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या एक्शन फँटसी चित्रपटाचे मुंबईतील एका आलिशान लोकेशनवर मुहूर्तासोबत चित्रिकरणाचा नुकताच शुभारंभ झाला. या चित्रपटाद्वारे अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी हे आघाडीचे कलावंत पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करीत आहेत. या चित्रपटात चौघांच्याही भूमिका एकदम हटके असून अधिक माहिती आता देऊ शकत नसलो तरी हे एक सरप्राईज पॅकेज आहे, असे दिग्दर्शक सुनिल परब यांचे म्हणणे आहे.

‘दिल मलंगी’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या निर्मितीसाठी रमाकांत भोसले, दीपा भोसले, प्रमोद मुरकुटे हे निर्माते एकत्र आले असून विविध क्षेत्रातील त्यांच्या अनुभवातून ‘दिल मलंगी’ची एक्शन फँटसी रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. ‘सून माझी भाग्याची’, ‘छावणी’, ‘चंद्री’, ‘पहिली भेट’, या चित्रपटांसह अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या सुनिल परब यांच्या कल्पक दिग्दर्शनातून ही फँटसी प्रत्यक्षात पडद्यावर आकार घेत असून येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने वेगवान चित्रिकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

चित्रपटाची कथा सतेज ढाणे पाटील या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्याचं खुल्लमखुल्ला प्रेम होतं.. पण ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं ती निव्वळ आपला टाईमपास करतेय हे लक्षात आल्यावर ‘प्रेम’ ह्या संकल्पनेवरचा त्याचा विश्वास उडतो.. साहजिकच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने तो मुंबई गाठतो. बुद्धिबळावर तो ‘ग्लोबल ट्रान्स मीडिया’ या जाहिरात एजन्सीचे सर्वेसर्वा हर्षवर्धन मराठे यांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो. मात्र ‘मुंबई नगरी’तल्या दैंनदिन प्रवासाला कंटाळून या शहराचा निरोप घेण्याचे ठरवितो. ही गोष्ट हर्षवर्धन यांना खटकते. ते सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम सुरू होतो आणि त्याच्या आयुष्याचे चक्र फिरू लागते..

सद्गुरू एंटरटेनमेंट, दीपलक्ष्मी निर्मित मनमोहक ‘दिल मलंगी’च्या कथेला खुसखुशीत विनोदाची झालर असून या चित्रपटातून तरुणाईच्या मनात अलगद सामाजिक संदेश रुजविण्यासाठी दिग्दर्शक सुनिल परब यांनी रॉम कॉम एक्शन फँटसीचा आधार घेतला आहे. कथाकार स्वप्निल गांगुर्डे यांनी ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेता प्रथमेश शिवलकर याच्यासोबत पटकथा लेखन केले असून संवाद प्रथमेश यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उद्गीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत आहेत.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content