Homeमुंबई स्पेशलवडाळ्याचा तरणतलाव १...

वडाळ्याचा तरणतलाव १ ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी उपलब्ध

‘जलतरण’ अर्थात ‘पोहणे’ हा जसा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकरांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ तरणतलावांच्या संख्येत आता आणखी एका तरणतलावाची भर पडणार आहे. वडाळा येथील अग्निशमन केंद्र परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेला व केवळ अग्निशमन दलासाठी राखीव असलेला तरणतलाव आता मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन सभासद नोंदणीप्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.

काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा तरणतलाव यापूर्वी केवळ मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राखीव होता. हा तरणतलाव येत्या १ ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी खुला करण्यात येत आहे. वडाळा येथील शेख मिस्त्री दर्गा मार्गावरील सीजीएस कॉलनी आणि म्हाडा कॉलनीच्या समोर असणाऱ्या वडाळा अग्निशमन केंद्र परिसरात हा तरणतलाव आहे, असे ते म्हणाले.

या तलाबाबतची माहिती खालीलप्रमाणे-

• या तरणतलावाचा आकार हा २५ मीटर × १५ मीटर इतका आहे.

• या तरणतलावाची खोली ही उधळ बाजूला १ मीटर इतकी असून दुसऱ्या बाजूला सर्वाधिक खोली ही २.९ मीटर इतकी आहे.

• या तरणतलावाची जलधारण क्षमता ७ लाख लीटर इतकी आहे.

• या तरणतलावामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी अत्याधुनिक ओझोन संयंत्र आहे.

• तरणतलाव सभासदांना पोहण्यासाठी पाण्यात उतरण्यापूर्वी व पोहणे झाल्यानंतर आंघोळीसाठी (शॉवर) १४ स्नानगृह आहेत. यापैकी ७ महिलांसाठी असून ७ पुरुषांसाठी आहेत. त्याचबरोबर महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी ३, यानुसार ६ शौचालयांचीदेखील याठिकाणी व्यवस्था आहे.

• या तरणतलावासाठी ऑनलाईन नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असून ती https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही प्रवेश प्रक्रिया “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या पद्धतीने सुरू आहे.

• सभासदत्व घेणाऱ्या सर्व सभासदांना तरणतलावाचे सर्व नियम व सुरक्षासंबंधी सर्व नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची व वैद्यकीय प्रमाणपत्रांची पूर्तता केल्यानंतरच सदर सभासदत्व अंतिम होणार आहे, याची सर्व संबंधितांनी आवर्जून नोंद घ्यावी.

• वडाळा तरणतलावात वार्षिक सभासदत्वासाठी २ हजार नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. तर त्रैमासिक व महिला विशेष बॅच सभासदत्वक्षमता प्रत्येकी ३०० इतकी आहे. ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारी ही नोंदणी “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या पद्धतीने होणार आहे.

• वार्षिक सभासदत्व शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये ८ हजार ४१० इतके आहे. तर त्रैमासिक सभासदत्व शुल्क रुपये २ हजार ३५० इतके आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी,‌ निवृत्त पालिका कर्मचारी आणि नगरसेवक यांना शुल्कात ५० टक्के सवलत आहे.

• या तरणतलावात सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत महिला विशेष बॅच असणार असून या बॅचला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना वार्षिक सभासदत्व शुल्कात २५ टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे या बॅचचे वार्षिक सभासदत्व शुल्क ६ हजार ३९० रूपये इतके असणार आहे, असे जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी कळविले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content