Homeकल्चर +सुरुवातीला माझ्याकडे लाईट, माईकसाठीही...

सुरुवातीला माझ्याकडे लाईट, माईकसाठीही बजेट नव्हतं!

माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाईलवर मी यूट्यूबसाठी व्हिडीओ करायला सुरूवात केली. लाईट आणि माईकसाठीसुद्धा बजेट नव्हतं. त्यामुळे खिडकीच्या समोर बसून सकाळी लवकर मी शूट करायचे, म्हणजे आवाज स्पष्ट येईल. आज माझ्या यूट्यूब सबस्क्रायबर्सचा टप्पा साडेनऊ लाखांपर्यंत पोहोचला आहे, माझी स्वतःची कंपनी आहे, टीम आहे आणि मी स्वतःचा स्टुडिओसुद्धा बांधला, असं अभिनेत्री आणि यूट्यूबर उर्मिला निंबाळकर अभिमानाने सांगते.

मराठीमधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मीडियावर तिने स्वतःचा ठसा उमटविला आहे. अनेक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे. उर्मिला जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि टेलिव्हीजन माध्यमातून काम करत होती. तिने अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच प्रसिद्ध हिंदी मालिकांतूनही काम केले. ज्यामध्ये दिया और बाती हम, दुहेरी, बन-मस्का यांचा समावेश आहे.

“खूप वर्षे मालिकेतून काम करत होते आणि माझ्याकडे खूप चांगल्या संधीसुद्धा होत्या. पण मालिकांमध्ये काम करताना दररोज 15-16 तास काम करावं लागतं. याचा शरीरावर खूप परिणाम होतो. अजूनही सगळ्या मालिका सासू-सुनांमध्येच अडकल्यामुळे मला ते पटत नव्हतं. त्याचवेळी ओटीटी प्लॅटफॅार्म आणि यूट्यूबवर खूप चांगल्या प्रतिचा कन्टेट येत होता. अनेक जागतिक दर्जाचे यूट्यूबर्स उदयाला येत होते. त्यामुळे मला असं वाटलं की स्वतःचं असं काहीतरी निर्माण करायला पाहिजे. कलाकार हा नेहमी चांगले चॅनल, प्रोडक्शन हाऊस, दिग्दर्शक यांच्यावरच अवलंबून असतो. पण यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचा कन्टेट आणि प्रेक्षकवर्ग निर्माण करायची संधी मिळते आणि या विचारातूनच मी 2018 साली गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वतःचा यूट्यूब चॅनल चालू केले”, असे तिने सांगितले.

पहिली दोन वर्षं प्रतिसाद कमी होता. तरीही उर्मिला वेगवेगळ्या विषयांचे व्हिडीओज बनवत राहिली. अनेक तांत्रिक बाबींचाही अभ्यास केला. फॅशन, मेक-अक, स्किनकेअर यासारख्या विषयांवर मराठीमध्ये काहीच कन्टेट नव्हता. हळूहळू प्रतिसाद वाढत गेला आणि बघताबघता हजारो आणि मग लाखो प्रेक्षक झाले. तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मेकअप आणि स्किनकेअर ब्रॅंडने तिच्यासोबत काम केले. इतकेच नाही तर स्टोरीटेल या ऑडिओबुक अॅपवर उर्मिलाने स्वतःच्या पॅाडकास्ट शोची निर्मिती केली तसेच अनेक ऑडिओ पुस्तकांना आवाजही दिला. तिच्या पेटलेला मोरपीस या ऑडिओ कादंबरीसाठी तिला मानांकीत बेस्ट व्हॉईस ऑफ इंडिया पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

“याचे सारे श्रेय आपल्या मराठी प्रेक्षकांचे आहे. मराठीत उत्तम प्रतिचा कन्टेट दिला तर प्रेक्षक तो उचलून धरतात. फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच गोष्टी चालतात हा गैरसमज आहे. मराठी यूट्यूबर्सना भरपूर संधी आहे. या क्षेत्रात भरपूर पैसा आहे. गुगलसुद्धा स्थानिक भाषांना प्रोत्साहन देत आहे आणि लोकांना आपल्या स्वतःच्या भाषेतच कन्टेट बघायला आवडतो. तो कोणीच बनवत नाही त्यामुळे बघितला जात नाही. हीसुद्धा सुरूवात आहे. अजून बरेच पुढे जायचे आहे”, असं उर्मिला सांगते.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content