Homeकल्चर +रोमांचक 'गलबत' उद्यापासून...

रोमांचक ‘गलबत’ उद्यापासून ओटीटी प्लटफॉर्मवर!

अल्ट्रा झकास या भारतातील प्रमुख मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना खास मनोरंजन देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा पूर्ण करताना उद्या ३ जुलै, २०२३पासून ‘गलबत’ हा नवा रोमांचक मनोरंजनात्मक चित्रपट सादर करणार आहे.

‘गलबत’ची ही कथा चंद्रकांत तानाजी लोढे यांची आहे. ‘गलबत’ ही लोभ, फसवणूक आणि एखाद्याच्या कर्माचे परिणाम यांची एक रोमांचकारी कथा आहे. हा चित्रपट किल्वर, या पैशाच्या भुकेल्या व्यक्तीभोवती फिरतो जो सतत रातोरात श्रीमंत होण्यासाठी योजना आखतो. त्याचा मुलगा, चावा, त्याच्या वडिलांच्या शेवटच्या दरोडाच्या योजनेत अडकतो आणि त्याला धोक्याच्या आणि फसवणुकीच्या गोंधळलेल्या जगात वावरण्यास भाग पाडले जाते. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी भावना आणि मनोरंजनाचा अत्युच्च बिंदू असल्याचे आश्वासन देतो. एक मनोरंजक कथानक आणि कलाकारांच्या विविधरंगी अभिनय कामगिरीसह, ‘गलबत’ प्रेक्षकांवर कायमची छाप सोडेल याची खात्री आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतीत बोलताना, अल्ट्रा झकासचे प्रवक्ते म्हणाले की, ‘गलबत’ हा चित्रपट आमच्या प्रेक्षकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की चित्रपटाचे अनोखे कथानक आणि अपवादात्मक कामगिरी प्रेक्षकांना आवडेल आणि अशा कथांची ते आणखी अपेक्षा करतील. मनोरंजनाचे विविध जिन्नस घेऊन हे ‘गलबत’ आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा रोमांचकारी अनुभव चुकवू नका.

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या.

अॅप लिंक: https://ultrajhakaas.app.link/

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content