Homeकल्चर +मेघना साने यांचे...

मेघना साने यांचे नवे गीत रसिकांच्या भेटीला…

गीतकार मेघना साने रचित आणि ऑस्ट्रेलियातील संगीतकार किरण प्रधान यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी आरएनबी साँगचे रेकॉर्डिंग सुप्रसिद्ध गायिका अबोली गिऱ्हे हिच्या सुमधुर आवाजात, अमर मोहिले यांच्या अंधेरीच्या स्टुडिओत करण्यात आले आहे. त्याचे प्रकाशन दादर येथील मुंबई बिट्स स्टुडिओमध्ये करण्यात आले. यावेळी चित्रपट निर्माते अर्जुन मुद्दा, प्रसिद्ध उद्योजक मोहन गोरे उपस्थित होते.

‘सांग तू ओढ ही लागतसे मज कशी’ असे या गाण्याचे शब्द आहेत. या गीतावर म्युझिटेक क्रिएशन यांच्याकडून व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून त्यात स्वतः अबोलीने नायिकेची भूमिका साकारली आहे. नायकाची भूमिका ठाणे येथील कलाकार हार्दिक सबनीस यांनी केली आहे. स्क्रीन प्ले आणि दिग्दर्शन मेघना साने यांचे आहे तर ओमकार आणि मानसी सूर्यवंशी यांनी चित्रिकऱण आणि एडिटिंग केले आहे. या कार्यक्रमास सर्व कलाकार उपस्थित होते. तर संगीतकार आणि या व्हिडिओचे निर्माते किरण प्रधान हे ऑनलाईन उपस्थित होते.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content