Homeकल्चर +सोलापुरात योग मल्‍टीमिडिया...

सोलापुरात योग मल्‍टीमिडिया प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद!

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूरच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित ह.दे.प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये २० ते २२ जून दरम्यान बहुमाध्यम छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप झाला असून तीन दिवसांत योग प्रेमी, योग साधक, नागरिक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली असल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली.

प्राचीन व शात्रोक्त असेलेल्या भारतीय योगाची माहिती व जाणीव जागृती व्हावे या उद्देशाने प्रथमच हरिभाई देवकरण प्रशालेतील मुळे सभागृह येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्‍युरो आणि जिल्‍हा व पोलिस प्रशासन यांच्‍यावतीने बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनात भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या ४५ मिनिटाचे कॉमन योग प्रोटोकॉल अनुसार प्रार्थना, शिथिलीकरण, दंड स्थितीतील ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, बैठक स्थितीतील दंडासन, भद्रासन/बध्दकोनासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन उष्ट्रासन, शशांकसन, उत्तान मंडूकासन, वक्रासन, पोटावर झोपून करावयाची आसने मकरासन, भुजंगासन, शलाभासन, पाठीवर झोपून करावयाची आसने सेतुबंधसर्वांगासन, उत्तान पादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, प्राणायाम, ध्यान, संकल्प आणि शांति पाठ या विषयी सविस्तर छायाचित्र व मजकूर सहित माहिती होती. या प्रदर्शनाला सोलापूर शहरातील शंभर शाळेतील पाच हजाराहून अधिक शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी दिल्या.

आंतरराष्‍ट्रीय योग दिवस हा आरोग्‍याची काळजी घेणेचे स्‍मरण करुन देतो. योगाच्‍या शास्‍त्रीय माहितीसाठी केंद्रीय संचार ब्‍युरोचे मल्‍टीमिडिया प्रदर्शन अत्‍यंत उपयुक्‍त असल्याचे  मत महानगरपालिका आयुक्‍त शीतल तेली उगले यांनी केले. केंद्रीय संचार ब्‍युरोने मल्‍टीमिडिया चित्रप्रदर्शनाच्या माध्‍यमातुन लोकांना आरोग्‍याबाबत दक्ष केल्याची भावना पोलिस आयुक्‍त राजेंद्र माने यांनी व्यक्त केले. मल्‍टीमिडिया प्रदर्शन हे सर्वांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त असून नेमकपणे माहिती देणारे दालन आहे, याचा सर्वांनी लाभ घ्‍यावा. असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.

सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले ठेवण्यात आले होते. तीन दिवसांत सोलापूर शहरातील नागरिक, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. यावेळी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, स्काय विंग्स इवेंट एंड एंटरटेनमेंट चे संचालक योगी कोंडाबत्तीनी, सूरज जाधव, अनुराग जाधव, प्रथमेश गाडगे, शिवशंकर मंडप कांट्रेक्टर किरण गवळी यांनी प्रदर्शनाचे नियोजनासाठी परिश्रम घेतले होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content