Homeएनसर्कलअंतिम श्वासापर्यंत काशी...

अंतिम श्वासापर्यंत काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी लढू!

उत्तर प्रदेशमधील काशी येथील ज्ञानवापी मशिदीत 16 मे 2022मध्ये शिवलिंग मिळाल्यापासून आम्ही सातत्याने त्याच्या मुक्तीसाठी लढा देत आहोत. या लढ्यात मुसलमान पक्षकार यशस्वी होणार नाहीत हे ज्ञात असल्याने, ते या याचिकेच्या संदर्भात अडथळे निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. तसेच काही जणांना हाताशी धरून याचिका मागे घेतल्याच्या अफवा पसरवत आहेत. प्रत्यक्षात कोणतीही याचिका आम्ही मागे घेतलेली नाही आणि मी सर्वांना खात्री देतो की, जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी आम्ही लढत राहू, अशी ग्वाही ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.

ते ‘श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात बोलत होते. काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या श्री श्रृंगारगौरी देवी, हनुमान, श्रीगणेश येथील देवतांची पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही लढा देत आहोत. काशी विश्वेश्वराची मुक्ती होईल, तेव्हा देश अखंड हिंदु राष्ट्र होईल. काशी विश्वेश्वराच्या मुक्तीचे मोठे लक्ष्य घेऊन आपण मार्गक्रमण करत आहोत. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी लावून धरायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी अधिवक्ता नीलेश सांगोलकरयांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संदर्भातील सद्यस्थिती, तसेच कर्नाटक येथील सहकार संजीवनी रुग्णालयाचे डॉ. एन्. रमेश हासन यांनी चन्नकेवर मंदिरात कुराण वाचण्याच्या विरोधात दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती दिली. आंध्र प्रदेश येथील हिंदू उपाध्याय समितीचे संस्थापक अध्यक्ष महेश डेगला यांनीही मनोगत व्यक्त केले.

गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक!

गंगा नदीमध्ये प्राणवायूची पातळी सर्वाधिक असून नदीत ‘बॅक्टेरिया फॉस’ नावाचा विषाणू असतो. त्यामुळे गंगाजल खराब होत नाही. कोरोनाकाळात गंगा नदीच्या किनार्‍यावरील शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण अन्य शहरांहून अल्प आढळले असून बरे होणार्‍यांची संख्याही अधिक आढळून आली आहे. केवळ कोरोनाच नाही, तर अन्य आजारही गंगेच्या पाण्याने बरे होऊ शकतात. त्यामुळे अशा गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अरुण गुप्ता यांनी व्यक्त केले.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content