Homeएनसर्कलघाऊक किंमत निर्देशांक...

घाऊक किंमत निर्देशांक -3.48% पर्यंत घसरला !

मे 2023 मध्ये प्रामुख्याने खनिज तेल, मूलभूत धातू, अन्नपदार्थ, कापड, बिगर -खाद्य वस्तू, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि रसायने तसेच रासायनिक उत्पादनांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईच्या दरात घसरण झाली.

मे 2023 (आधार वर्ष: 2011-12) महिन्यासाठी भारतातील घाऊक किमत निर्देशांक अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर एप्रिल,2023 मध्ये नोंदलेल्या (-)0.92% च्या तुलनेत मे, 2023 (मे 2022 च्या तुलनेत ) महिन्यासाठी (-) 3.48% (तात्पुरता ) झाला आहे. मे 2023 मध्ये चलनवाढीच्या दरात झालेली घसरण ही प्रामुख्याने खनिज तेल, मूलभूत धातू, अन्न पदार्थ, कापड, अ-खाद्य वस्तू, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि रसायने तसेच रासायनिक उत्पादनांच्या किमतीतील घसरणीमुळे झाली आहे. सर्व वस्तू आणि घाऊक किंमत निर्देशांक घटकांचे मागील तीन महिन्यांचे निर्देशांक आणि महागाई दर खाली दिले आहेत.

Index Numbers & Annual Rate of Inflation (Y-o-Y in %)*
All Commodities / Major GroupsWeight (%)Mar-23 (F)Apr-23 (P)May-23 (P)
IndexInflationIndexInflationIndexInflation
All Commodities1001511.41150.9-0.92149.6-3.48
I. Primary Articles22.62175.22.52177.31.6175.3-1.79
II. Fuel & Power13.15156.48.69152.60.93148.6-9.17
III. Manufactured Products64.23141.3-0.7141.2-2.42140.7-2.97
Food Index24.38172.12.32173.60.17172.8-1.59

2. एप्रिल, 2023 च्या तुलनेत मे, 2023 च्या घाऊक किंमत निर्देशांकामध्ये झालेला बदल (-) 0.86% होता.  गेल्या सहा महिन्यांमध्ये घाऊक किंमत निर्देशांकामध्ये झालेला मासिक बदल खाली संक्षिप्त स्वरूपात दिला आहे.

Month Over Month (M-o-M in %) change in WPI#
All Commodities / Major GroupsWeightDec-22Jan-23Feb-23Mar-23Apr-23 (P)May-23 (P)
All Commodities100-1.310.130.130.07-0.07-0.86
I. Primary Articles22.62-3.080.81-0.40.921.2-1.13
II. Fuel & Power13.15-2.95-1.521.29-0.76-2.43-2.62
III. Manufactured Products64.23-0.140.210.14-0.21-0.07-0.35
Food Index24.38-2.40.47-0.120.470.87-0.46

3. घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकाच्या प्रमुख गटांमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये झालेला बदल,

1.प्राथमिक वस्तू (भार 22.62 टक्के): या प्रमुख गटाच्या निर्देशांकात एप्रिल, 2023 च्या 177.3 (तात्पुरत्या) वरून मे, 2023 मध्ये 1.13% ने घट होऊन तो 175.3 (तात्पुरता) झाला.  एप्रिल, 2023 च्या तुलनेत मे, 2023 मध्ये खनिजांच्या किमती (0.90%) वाढल्या. एप्रिल 2023 च्या तुलनेत मे, 2023 मध्ये अन्नपदार्थ (-0.22%), अ – खाद्य वस्तू (-1.87%) आणि कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (-7.81%) च्या किमती घसरल्या.

2. इंधन आणि उर्जा (भार 13.15%) : या प्रमुख गटाचा निर्देशांक एप्रिल 2023 मधील 152.6 (तात्पुरत्या) वरून  मे, 2023 मध्ये 2.62% ने घसरून 148.6 (तात्पुरता) वर आला आहे. एप्रिल 2023 च्या तुलनेत मे 2023 मध्ये कोळसा  (-0.67%), खनिज तेल (-2.01%) आणि वीज (-5.46%) यांच्या किमतीत घट झाली.

3. उत्पादित उत्पादने (भार 64.23%): या प्रमुख गटाचा निर्देशांक एप्रिल 2023 च्या 141.2 (तात्पुरत्या) वरून मे, 2023 मध्ये 0.35% घसरून 140.7 (तात्पुरता) वर आला आहे. उत्पादित वस्तूंच्या 22 एनआयसी दोन अंकी गटांपैकी, 7 गटांच्या किमतीत वाढ झाली आहे, तर 11 गटांच्या किमतीत घट झाली आहे.  ज्या गटांनी एप्रिल 2023 च्या तुलनेत मे 2023 मध्ये किंमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली आहे ते आहेत विद्युत  उपकरणे ; फार्मास्युटिकल्स, औषधी, रासायनिक आणि वनस्पतिजन्य उत्पादने; तंबाखू उत्पादने; लाकूड आणि लाकूड आणि कॉर्क उत्पादने; चामडे आणि संबंधित उत्पादने; शीतपेये इ.. काही गट ज्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत ते आहेत मूळ धातू ; अन्नपदार्थ ; कापड;  रासायनिक आणि रासायनिक उत्पादने, इतर उत्पादन इत्यादी.

4. डब्ल्यूपीआय खाद्यान्न निर्देशांक (भार 24.38%): प्राथमिक वस्तू गटातील ‘अन्न पदार्थ ‘ आणि उत्पादित उत्पादने गटातील ‘अन्नपदार्थ ‘ यांचा समावेश असलेला खाद्यान्न निर्देशांक एप्रिल, 2023 मधील 173.6 वरून मे, 2023 मध्ये 172.8 पर्यंत  घसरला आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या खाद्यान्न निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एप्रिल, 2023 मधील  0.17% वरून मे, 2023 मध्ये (-) 1.59% पर्यंत घसरला आहे.

5. मार्च, 2023 महिन्यासाठी अंतिम निर्देशांक (आधार वर्ष: 2011-12=100): मार्च, 2023 महिन्यासाठी अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि ‘सर्व वस्तू’ साठी महागाई दर (आधार: 2011-12=100) अनुक्रमे 151.0 आणि 1.41% इतका राहिला. अद्ययावत आकडेवारीवर  आधारित विविध वस्तू  गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाई दरांचे तपशील परिशिष्ट I मध्ये आहेत. गेल्या सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक महागाई दर (Y-o-Y) परिशिष्ट II मध्ये दिला  आहे. मागील सहा महिन्यांतील विविध वस्तू  गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांक परिशिष्ट III मध्ये  आहे.

6. प्रतिसाद दर: मे, 2023 साठी घाऊक किंमत निर्देशांक  89.8 टक्के भारित प्रतिसाद दराने संकलित केले आहे, तर मार्च 2023 साठी अंतिम आकडेवारी 92 टक्के भारित प्रतिसाद दरावर आधारित आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या अंतिम दुरुस्ती धोरणानुसार निर्देशांकाच्या तात्पुरत्या आकडेवारीत सुधारणा केली जाईल.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content