Homeमुंबई स्पेशलआता मुंबईतील डबेवाल्यांनाही...

आता मुंबईतील डबेवाल्यांनाही मिळणार परवडणारी घरे!

मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व डबेवाले संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार श्रीकांत भारतीय यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला डबेवाला ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे व भाजपा प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

१८९०पासून मुंबईमध्ये सेवा पुरवणाऱ्या डबेवाल्यांना मालकीची घरे मिळावीत, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. याबाबत आपण विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात  लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी फडणवीस यांनी डबेवाल्यांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आजच्या बैठकीचे आयोजन केले होते. म्हाडा, सिडको तसेच महसूल विभागाकडून जागा घेऊन डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

डबेवाल्यांना त्यांची सेवा देणे सोईस्कर होईल अशा ठिकाणी त्यांना घरे देण्यात येतील. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी उपयुक्त असलेले मुंबई डबेवाला भवन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही भारतीय यांनी स्पष्ट केले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content