Homeमुंबई स्पेशलसोमवारी के पूर्व...

सोमवारी के पूर्व आणि के पश्चिम विभागात पाणीपुरवठा बंद

मुंबईतल्या के/पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे नवीन १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) जोडण्याचे काम सोमवारी, ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा १६ तास बंद राहणार आहे तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सोमवारी या विभागातल्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

के / पूर्व आणि के / पश्चिम विभाग-

१) त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब- पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

२) सारीपुत नगर, दुर्गा नगर- पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

३) विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण, पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले रोड, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान रोड, श्रद्धानंद रोड, नेहरू रोड, तेजपाल रोड, शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, डोमेस्टिक एयरपोर्ट, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा- पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

४) मोगरपाडा, नवीन नागरदास रोड, जुना नागरदास रोड- पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

५) मोरागाव, जुहू गावठाण- पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

४ ते ८ जूनदरम्‍यान एच / पूर्व विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा

दरम्यान, सांताक्रुझ (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी स्‍मशानभूमीनजिकच्‍या १ हजार २०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचे पुनर्वसन आणि मजबुतीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेण्यात येणार असून हंसबुर्गा रोड पुलाखालील वैतरणा जलवाहिनीवरील गळती दुरूस्‍तीचेही काम केले जाणार आहे. या कामांमुळे रविवार, ४ जून २०२३ ते गुरूवार, ८ जून २०२३दरम्‍यान एच / पूर्व विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

पाणीपुरवठा कमी दाबाने होणारा परिसर असा-

१) रविवार, ४ जून २०२३: वांद्रे-कुर्ला संकुल येथील पाणीपुरवठा सकाळी ८.३० ते १०.४५ वाजेपर्यंत होईल.

२) सोमवार, ५ जून २०२३: संपूर्ण एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

३) मंगळवार, ६ जून २०२३: संपूर्ण एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

४) ५ जून ते ८ जून २०२३: भारत नगर, वाल्मिकी नगर, महाराष्‍ट्र नगर, वांद्रे-कुर्ला संकुल येथे पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

संबंधीत परिसरातील नागरिकांनी यादृष्टीने अगोदरच पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content