Homeएनसर्कलशरद पवारांनी घेतली...

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट आणि चॅनल्समध्ये खळबळ!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने टीव्हीवरील न्यूज चॅनल्सच्या वार्ताहरांमध्ये एकच खळबळ उडाली. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच ही सदिच्छा भेट असल्याचे जाहीर केल्यानंतर न्यूज चॅनल्सच्या बातमीदारांची तोंडे पाहण्यासारखी झाली.

आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया येथील ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहोळ्याच्या कार्यक्रमातून निघालेले मुख्यमंत्री तडक वर्षा, या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ पवार वर्षावर पोहोचले. दोन्ही नेत्यांनी छायाचित्रकारांसमोर फोटोसाठी पोझही दिल्या. नंतर अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर पवार निघून घेले. पवार वर्षावर पोहोचल्याचे कळताच टीव्ही चॅनलवरच्या कपोलकल्पित चर्चा आणि आडाख्यांना ऊत आला. त्या अर्ध्या तासात अनेक कथित राजकीय विश्लेषकांनी मोठमोठी उड्डाणे केली. त्यातच पवार वार्ताहरांशी न बोलताच निघून गेल्याने या चर्चेला जरा धारच चढली होती. परंतु तितक्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर भाष्य केले. पवार यांची ही भेट सदिच्छा भेट होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पवार मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांनी आपल्याला दिले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर एक्साईट झालेले वृत्तनिवेदक भानावर आले. नंतर या बातमीलाही फारसे स्थान मिळाले नाही.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content