मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, ४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता धनाश्री घैसास यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तनय रेगे तबल्याची तर ज्ञानेश्वर सोनवणे संवादिनीची साथ करतील. हा कार्यक्रम कुणाल भावे यांनी प्रायोजित केला असून रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

धनाश्री घैसास यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण कुमुदिनी काटदरे यांच्याकडे घेतल्यानंतर डॅा. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे तालीम घेतली. त्यांना शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीत शिक्षणासाठी भारत सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळाली होती. आकाशवाणीच्याही त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. सवाई गंधर्व महोत्सव (पुणे), गणसरस्वती महोत्सव (पुणे), पं. मल्लिकार्जुन मंसूर महोत्सव (धारवाड), एनसीपीए, मुंबई, बनारस हिंदू विश्वविद्यालय, पं. जसराज ऑडिटोरियम (न्यूयॉर्क) अशा काही प्रतिष्ठित महोत्सवांमधे त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत.


