Homeकल्चर +उद्या विनामूल्य आनंद...

उद्या विनामूल्य आनंद घ्या ‘शतजन्म शोधिताना’…

मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकात उद्या म्हणजेच रविवारी, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीदिनी ‘शतजन्म शोधिताना’ हा भव्य संगीतमय कार्यक्रम होत आहे.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई उत्कर्ष मंडळ यांनी याचे आयोजन केले आहे. स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड यांनी याची निर्मिती केली आहे. स्वा. सावरकर यांची अलौकिक काव्यप्रतिभा आणि त्यांचे कार्यकर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवणारा हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. रविवारी, २८ मे २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता स्वा. सावरकर स्मारकाच्या सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिकांसाठी स्वा. सावरकर स्मारकाच्या ९२२००७०३८६, या क्रमांकावर किंवा हरिश्चंद्र शिंदे यांच्याशी ९०८२३४५७२९ क्रमांकावर संपर्क साधावा. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्यासाठी आधी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.

स्वा. सावरकर यांच्या विविध प्रकारच्या कविता, गीते यांचे संगीतबद्ध सादरीकरण करून त्यावर नृत्याचाही अविष्कार करीत हा ‘शतजन्म शोधिताना’ कार्यक्रम प्रेक्षकांना, रसिकांना आणि सावरकरप्रेमींना खिळवून ठेवतो. याची संकल्पना संहिता आणि निवेदन मंजिरी मराठे यांचे असून संगीत दिग्दर्शन वर्षा भावे आणि नृत्य दिग्दर्शन डॉ. रुपाली देसाई यांचे आहे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. सावरकरांच्या अलौकिक अशा प्रतिभेचा शोध यानिमित्ताने घेतला गेला आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content