Homeएनसर्कल30 हजार बोगस...

30 हजार बोगस सिमकार्डस बंद! एकाच्या नावावर 684 मोबाईल क्रमांक!!

बनावट कागदपत्रे वापरुन खरेदी करण्यात आलेली सुमारे 30 हजार सिमकार्डस दूरसंचार विभागाने बंद केली आहेत. दूरसंचार विभागाने स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म ‘एएसटीआर’ अस्त्राचा वापर करत, बनावट/खोट्या मोबाईल कनेक्शन्सचे जाळे आणि सायबर गुन्ह्याचा यानिमित्ताने पर्दाफाश केला आहे. एका प्रकरणात तर, एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला 684 वेगवेगळे मोबाईल क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

दूरसंचार सेवा प्रदाते – TSP यांनी जारी केलेले मुंबईतील 30 हजारपेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाईल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले आहेत. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसएने या सर्व मोबाईल जोडण्या तपासल्या असून त्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे. त्यातून त्यांना 62 समूह असे आढळले आहेत, जिथे एकाच छायाचित्राचा वापर करून, वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आले आहेत.

एका समुहात, असे 50 ग्राहक असण्याची मर्यादा आहे. मात्र असे असूनही, या 62 समुहांमध्ये एकूण 8,247 ग्राहक आढळले. याचाच अर्थ, यात पॉईंट ऑफ सेल, म्हणजेच जिथून यांची विक्री केली जाते, असे सिम विक्रेते, यांचाही बनावट सिमकार्ड देण्याच्या कारस्थानात सहभाग असल्याचे स्पष्ट होते. एका प्रकरणात तर, एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला 684 वेगवेगळे मोबाईल क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

मोबाईल

केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल संचार साथी पोर्टलचे उद्‌घाटन केले. या सोहळ्यात आभासी पद्धतीने सहभागी झाल्यानंतर पत्रकारांना संचार साथी, या पोर्टलबद्दल तसेच एएसटीआर अस्त्र, या चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या तसेच माहितीचे विश्लेषण करणाऱ्या विविध तंत्राचा वापर असलेल्या प्रणालीची माहिती मुंबईतील दूरसंचार विभागाचे अतिरिक्त महासंचालक, एच. एस. जाखड यांनी ही माहिती दिली. यावेळी, नंदलाल सचदेव, उपमहासंचालक (ए अँड एचआर), किशोर एक्का, उपमहासंचालक, सुरक्षा, अजय कमल, उपमहासंचालक – तंत्रज्ञान हे अधिकारी उपस्थित होते.

दूरसंचार विभागाने, बनावट सिमकार्डचे हे रॅकेट शोधून काढण्यासाठी एक अभिनव, स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म (सुपर कॉम्प्युटरचा वापर करून) ASTR – अस्त्र यात कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सायबर गुन्ह्यांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी बनावट/खोट्या मोबाईल कनेक्शनचा तपास करणे, ते ओळखणे आणि ते नष्ट करणे, या दृष्टिकोनातून दूरसंचार विभागाद्वारे या तंत्रज्ञानाची रचना आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे असे, दूरसंचार विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सांगितले. ह्या प्रणालीअंतर्गत, ग्राहकांचे छायाचित्र आणि त्यांची माहिती यांची तुलना केली जाते आणि त्यातून मिळणारी माहिती, वेगवेगळ्या नावांच्या त्याच छायाचित्राच्या महितीशी पडताळून पाहिली जाते.

बनावट/खोट्या माहितीच्या आधारे घेतलेले मोबाईल सीमकार्ड, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, राष्ट्रविरोधी करवायांसाठी वापरले जाऊ शकतात. अशी बनावट कागदपत्रे तयार करणारे यात इतके चलाख असतात, की त्यांनी, अशी बनावट ओळखपत्रे, निवासाचे पुरावे तयार केले आहेत, जे मानवी नजरेतून कधीही पकडले जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच, दूरसंचार विभागाने, असे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एएसटीआर अस्त्र, ह्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मचा वापर करत, अशा बनावट-खोट्या सीम्सचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.

या संदर्भात, मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशन, व्हीपी मार्ग पोलीस स्टेशन, डीबी मार्ग पोलीस स्टेशन, डीएन नगर पोलीस स्टेशन, सहार पोलीस स्टेशन, बांगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. अशा कारवाईमुळे, मुंबईतील सायबर गुन्ह्यांसह विविध बेकायदेशीर कामांसाठी अशा बनावट/बनावट, नॉन-बोनाफाईड मोबाईल कनेक्शनचा वापर रोखण्यास मदत मिळू शकेल.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content