Homeकल्चर +स्वा. सावरकर स्मारकाचे...

स्वा. सावरकर स्मारकाचे विविध पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येणाऱ्या शौर्य, विज्ञान, समाजसेवा आणि स्मृतीचिन्ह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या २१ मे २०२३ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार – २०२३’ हा मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना (मरणोपरांत) प्रदान केला जाणार आहे. तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२३’ हाकानपूर आय.आय.टी.चे संचालक प्रा. अभय करंदीकर यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार – २०२३’,  हा पुरस्कार नागपूरच्या मैत्री परिवार या संस्थेला घोषित करण्यात आला आहे. सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी असणारा व्यक्ती वा संस्थेसाठी असणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार – २०२३’ यावेळी रत्नागिरी येथील अधिवक्ता प्रदीप (बाबा) चंद्रकांत परुळेकर यांना देण्यात येणार आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content